कोल्हापूर : वाढती महागाई, बदलत्या गरजा, मुलांचे शिक्षण, लग्न, वैद्यकीय खर्च, भविष्याची तरतूद या सगळ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हवा असतो तो पैसा. तो योग्य ठिकाणी गुंतविला की त्याचा मिळणारा परतावा कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षाकवच ठरतो; म्हणूनच आपला पैसा कुठे आणि कसा गुंतवावा, यावर ‘लोकमत’तर्फे सोमवारी (दि. २७) ‘स्मार्ट इन्व्हेस्टर’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे सायंकाळी ५.३० वाजता हा गुंतवणूकदार प्रशिक्षण उपक्रम होईल. यात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील हे गुंतवणुकीवर मार्गदर्शन करणार आहेत.
सार्वजनिक जीवनात पैशांची असुरक्षितता, बॅँकांच्या ठेवींवर कमी झालेले व्याजदर या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
या फंडात पैसा गुंतविल्यानंतर काही वर्षांनी चांगला परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदार आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या फंडात पैसा गुंतवून कुटुंबासाठीची आर्थिक तरतूद करीत आहेत. महिन्याभराच्या सर्व खर्चांचे नियोजन करून शिल्लक राहणारी रक्कम म्युच्युअल फंडांमध्ये गुंतविली जाते.
ही गुंतवणूक कशी व कोणत्या पद्धतीच्या फंडात करावी, याबद्दल गुंतवणूकदारांना योग्य दिशा मिळावी, यासाठी ‘लोकमत’ व ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड’तर्फे हा उपक्रम होत आहे.यात बचत आणि गुंतवणुकीमधील अंतर कमी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी दीर्घ मुदतीची संपत्ती निर्माण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळेल. आयुष्यातील आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करून स्वप्नांजवळ घेऊन जाण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरेल. म्हणूनच कार्यक्रमास भेट द्या आणि तुमच्या गुंतवणुकीशी निगडित सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. अधिक माहितीसाठी ९७६७२६४८८५, ९०४९०८७६७७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.कार्यक्रम सर्वांसाठी नि:शुल्क असेल.उपस्थितांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था व आकर्षक भेटवस्तू.मर्यादित जागा : पहिले या, पहिली जागा मिळवा.