शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘अमावास्ये’च्या रात्री ‘स्मशान सहल’

By admin | Published: April 19, 2015 11:52 PM

गडहिंग्लज ‘अंनिस’चा उपक्रम : ऐनापूर स्मशानभूमीची कार्यकर्त्यांकडून साफसफाई

प्रकाश चोथे - गडहिंग्लज रात्रीची शांत वेळ... नदीकाठचा निर्मनुष्य परिसर... आणि अशा वातावरणात साठ-सत्तर जणांचा कंपू एकत्र जमतो... एका बाजूला गाणी, गप्पा, माहिती असा कार्यक्रम रंगत जातो... दुसऱ्या बाजूला काट्या- कुट्याची तीन दगडांची चूल पेटून साधेच; पण रुचकर जेवण तयार होते... गप्पागोष्टींसोबत जेवणाची पंगत उठते... आणि मध्यरात्री बारानंतर कंपू आपापल्या घराकडे वळतो...!यावरून ही ‘कोजागिरी’ची सहल असेल, असाच समज प्रत्येकाचा होईल; पण... प्रत्यक्षात मात्र ही होती स्मशान सहल; तिही अमावास्येच्या रात्रीची..! गडहिंग्लज शाखेच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे या अनोख्या सहलीचे आयोजन करून ग्रामस्थांच्या मनातली भुता-खेतांविषयीची भीती समूळ नष्ट करण्यासाठी...‘अंनिस’चे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. पी. डी. पाटील, बाळासाहेब मुल्ला, आदींनी संकल्पना मांडली, तर अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यास मूर्त रूप दिले. हिरण्यकेशीच्या तीरावर स्मशानभूमीची कार्यकर्त्यांनी प्रथम साफसफाई केली. शाहीर सदानंद शिंदे यांनी शाहिरी थाटात व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाची गाणी सादर केली. थोड्याशा लांबूनच उत्सुकतेने पाहणारे काही तरुण मग बिचकतच सामील झाले. एरव्ही ज्याला हातही लावायचं धाडस करणार नाहीत, अशा चिता रचण्याच्या लोखंडी जाळीत बसून काही चिमुरड्यांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.प्रा. बाळासाहेब मुल्ला यांनी माणसाच्या मनातल्या काल्पनिक भुतांविषयी मार्गदर्शन करून व्यर्थ भीती घालविण्याचा प्रयत्न केला. प्रा. भोईटे यांनी समाजाला आकर्षित करणाऱ्या बुवांचे ‘पाण्याचा दिवा पेटविणे’, ‘मंत्राने अग्नी पेटविणे’, ‘कागदावर भूत उमटविणे’, आदी प्रयोग सादर करून चमत्कारामागील विज्ञान सांगितले. सर्पमित्र प्रा. अनिल मगर, मेहबूब सनदी यांनी सापांविषयी मार्गदर्शन केले.भुतांविषयी पिढ्यान्पिढ्या ऐकून ‘भुतं खरंच असतात’ या माणसाच्या विचाराला छेद देणाऱ्या ‘अंनिस’च्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक झाले. यामध्ये पा. ल. करंबळकर, डॉ. एस. के. नेर्ले, डॉ. रमेश तिबिले, तानाजी कुरळे, शिवाजी पाटील, अशोक मोहिते, उत्तम पालेकर, आदींसह ‘अंनिस’चे कार्यकर्ते आणि ऐनापूरचे ग्रामस्थ सहभागी झाले.