शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

सरकारी कार्यालयातच राजरोस धूम्रपान, तंबाखूचे सेवन; कोल्हापुरात 'इतक्या' लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 4:23 PM

मानवी आरोग्यासाठी धोकादायक

समीर देशपांडेकोल्हापूर : सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी असतानाही अनेक शासकीय कार्यालयांच्या परिसरात सर्रासपणे अधिकारी, कर्मचारी सिगारेट फुंकताना दिसत आहेत. तंबाखूची गोळी तोंडात धरूनही अनेकजण काम करत असल्याचे पाहावयास मिळते. गेल्या सहा वर्षांत अशा पद्धतीने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २ हजार २१९ जणांकडून प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे ४ लाख ८२ हजार ५७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.भारतामध्ये ५४ टक्के तंबाखूचे सेवन हे विडीच्या तर १९ टक्के सेवन हे सिगारेटच्या स्वरुपामध्ये केले जाते. भारतामधील सिगारेटमध्ये डांबर आणि निकोटिनचे प्रमाण विकसित देशांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळेच ते मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, जठर, अन्ननलिका, मुत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ शकतो.गुटख्यामध्येही आरोग्यासाठी घातक घटक असल्यामुळे २००२ पासून महाराष्ट्रात गुटख्याला बंदी घालण्यात आली आहे. तरीही चोरून गुटखा विक्री सुरू असून यावरही अनेक ठिकाणी कारवाई होत आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत याबाबत सातत्याने जनजागरण करण्यात येत असून यासाठी काही कायदेही करण्यात आले आहेत. कायद्याची माहिती देणारे फलक लागणार

  • सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे. कलम ५ नुसार तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी आहे, कलम ६ अ नुसार १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे. 
  • ६ ब नुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. तर कलम ७ नुसार सर्व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टनावर ८५ टक्के भागात निर्देशित धोक्याची सूचना अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार या कायद्याची माहिती देणारे फलक शासकीय कार्यालये आणि शाळांच्या आवारात लावण्याचे काम सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे.

निष्क्रिय धूम्रपानाचाही धोकाजेव्हा एखादी व्यक्ती धूम्रपान करते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात सुमारे ३० टक्के तंबाखूचा धूर जातो. तर सुमारे ७० टक्के धूर हा वातावरणात सोडला जातो. त्याच्या आजूबाजूच्या व्यक्ती हा वातावरणातील धूर नकळत सेवन करत असतात याला निष्क्रिय धूम्रपान म्हणतात. जे धोकादायक ठरते. पालकांकडून होणाऱ्या धूम्रपानामुळे लहान मुलांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता सहा पटीने वाढते असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील दंड वसुली (डिसेंबर २०१६ ते ऑक्टोबर २०२२ मधील दंडवसुली)

विभागदंड वसुली   नागरिकांची 
आरोग्य विभाग ७१,३७५ ६२९
पोलिस विभाग ३,२९,३२० १,४८७
अन्न व औषध प्रशासन ८१,८७५ १०३
एकूण ४,८२,५७० २,२१९

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर