शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

..तर मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार - हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 1:45 PM

केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता. कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करा

कागल : माझा जावई एमआयडीसीतील छोटा कारखानदार आहे. ब्रिक्स कंपनी किंवा आरोप केले जात असलेल्या जीएसटी सल्लागार कंपनीशी त्याचा कोणताही संबंध नाही. फक्त मुश्रीफांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्यासाठी त्याला बदनाम केले जात आहे. आज केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे. तुम्ही कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करा. माझा जावई यात कोठे आढळला तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे; पण ज्यांचा कोठे संबध नाही अशा कुटुंबावर नाहक शिंतोडे उडवू नका, असे आवाहन माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

किरीट सोमय्या यांच्या विरुद्ध कोल्हापूर न्यायालयात दीड कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा सुरू आहे. ते पुढील तारखा घेत आहेत, असेही मुश्रीफ म्हणाले. कागल येथे पत्रकारांशी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्यावर तर ते केवळ माझे जवळचे कार्यकर्ते आहेत म्हणूनच छापा टाकण्यात आला. हे माझ्यासाठी वेदनादायी आहे.

ईडी, आयकर आणि आरओसी म्हणजे रजिस्ट्रार ऑफ कंपनी अशा तीन केंद्रीय यंत्रणांकडून आमच्यावर व सरसेनापती साखर कारखान्यावर तीन वेळा छापा टाकला आहे. आरओसीच्या कारवाई विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात गेलो आहोत. तेथे स्थगितीही मिळाली आहे.

सरसेनापती साखर कारखाना हजारो शेतकऱ्यांनी दिलेल्या पैशातून उभारला आहे. आमची कौटुंबिक मालमत्ता बॅंकांना तारण देऊन कर्ज उभारणी केली आहे. पत्रकार परिषदेवेळी भय्या माने, युवराज पाटील, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, नेताजी मोरे, संदीप भुरले, विवेक लोटे उपस्थित होते.व्यवहारच नाही तर घोटाळा कसा ?ग्रामपंचायतीसाठी जीएसटीसंदर्भात एकसूत्रता व कमी खर्चात सल्लागार मिळावा म्हणून अनेकांनी केलेल्या सूचनेनुसार राज्यपातळीवर एकच एजन्सी नेमण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री म्हणून जरूर घेतला; पण यातील त्रुटी लक्षात आल्यावर कोणतीही एजन्सी न नेमता तो निर्णय रद्दही केला. यात एक पैशाचा व्यवहार झाला नाही, मग यात पंधराशे कोटींचा घोटाळा कोठे व कसा झाला? तेच तेच आरोप करून दिशाभूल केली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय