शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

...म्हणून कर्नाटकची एसटी फायद्यात, जाणून घ्या काय वेगळेपण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 8:04 AM

चार विभागांत कामकाज; महाराष्ट्राच्या तुलनेत सक्षम

भीमगोंडा देसाई

कोल्हापूर : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याऐवजी चार विभागांत विभाजन केले आहे. २० वर्षांपूर्वीच त्यांनी हा निर्णय घेतल्याने तेथील राज्य सरकारची परिवहन सेवा महाराष्ट्राच्या तुलनेत अतिशय चांगली आहे. राज्याच्या चार विभागांतून प्रशासकीय काम चालत असल्याने कोणत्या हंगामात कोठे उत्पन्न मिळते, तिथे बस सेवा कशी दिली पाहिजे याचे काटेकोर नियोजन केले जाते. परिणामी तेथील एस.टी. महामंडळ सक्षम कार्यरत आहे. याउलट महाराष्ट्रात याकडे दुर्लक्ष झाल्याने महामंडळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले आहे. 

कर्नाटकातही १९९७ पूर्वी एकच राज्य परिवहन महामंडळ होते. बंगळुरूमधून राज्यभर याचे व्यवस्थापन चालत असे. पण एसटीच्या चांगल्या सेवेसाठी सूक्ष्म नियोजन आणि प्रशासकीय कामकाज गतीने चालण्यासाठी चार विभाग करण्यात आले. वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाची स्थापना १ नोव्हेंबर १९९७ रोजी झाली. त्याचे कार्यालय हुबळीत आहे. ईशान्य कर्नाटक परिवहन महामंडळची स्थापना १ ऑक्टोबर २००४ रोजी झाली. याचे कार्यालय गुलबर्गा येथे आहे. बृहन बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाची स्थापना १५ ऑगस्ट १९९७ रोजी झाली. बंगलोर येथे मूळ कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ आहे. अशा चार विभागातर्फे संपूर्ण कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथे ३५,१३८ बसेस धावतात. याउलट महाराष्ट्रात एकच महामंडळ राहिले. विस्कळीत नियोजन आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ खंगत राहिले.

दृष्टिक्षेपात २ राज्यांतील बसकर्नाटक : बसची संख्या : ३५,१३८कर्मचारी : १,२७,४८५ महाराष्ट्र : बसची संख्या : १६,३००कर्मचारी : ९३,३७०

टॅग्स :ST Strikeएसटी संपKarnatakकर्नाटकAnil Parabअनिल परब