म्हाकवे/कोल्हापूरसातवा वेतन... ना भरघोस मानधन तरीही निषपृह भावनेतून तुटपुंज्या मानधनावर जीव धोक्यात घालून देशाला कोरोनामुक्तीच्या लढयाला बळ देण्याचे काम आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका करत आहेत.मात्र,आज म्हसवे(ता.भुदरगड)या गावात निता संजय काशिद या आशा वर्कर व एका अंगणवाडी सेविका यांच्यावर सुरेश गणपती तांबेकर आणि मुलगा शेखर सुरेश तांबेकर यांनी आशा वर्कर यांना घरात चौकशी करीत असताना घराबाहेर ओढत आणत मारहाण केली.तसेच,अर्वाच्य शिवीगाळ सुध्दा केली आहे.त्यामुळे यांना तात्काळ अटक करून कारवाई व्हावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सीटू संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
कोल्हापुर जिल्हयात जिल्हा आरोग्य पथका बरोबर आशा,गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका, मदतनीसही कार्यरत आहेत.शासनाच्या आदेशानुसार त्या काम करत ब-याच आशाना मागील महिन्याचे मानधन आणि घोषित वाढीव भत्ताही मिळालेला नाही तरीही त्या दैनंदिन कामात अजिबात कसूर करीत नाहीत.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्हयातील आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्या वर हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. शाहूवाडी, चंदगड तालुक्यातील आशां या घरी चौकशी ला गेल्यावर त्यांच्या वर हल्ले झाले आहेत. या बाबत प्रशासनाला कल्पना देवूनही प्रशासन आणि पोलिस हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत नाहीत.हे कर्मचारी भयभीत झाले आहेत
घरामध्ये बानगे(ता.कागल)या गावातून एक महिला आणि दोन लहान मुले आल्याचे शेजारच्या लोकांनी आरोग्य विभागाला कळविले होते त्यामुळे आरोग्य विभागाचे पथकच चौकशी ला गेले असता हा प्रकार घडला आहेयाबाबत सिटुचे जिल्हा अध्यक्ष कॉ भरमा कांबळे,जिल्हा सचिव कॉ सुभाष जाधव, कार्याध्यक्ष कॉ. चंद्रकांत यादव,जिल्हा उपाध्यक्ष कॉ शिवाजी मगदूम,कॉ. नेत्रदीपा पाटील,कॉ. उज्ज्वला पाटील,कॉ.दत्ता माने,कॉ.आबासाहेब चौगुले,कॉ. ए. बी. पाटील,इम्रान जंगले,कॉ.सुभाष कांबळे,कॉ. प्रकाश कुंभार यांनी तीव्र संताप व्यक्त केला.आम्हाला हरविणार्यावर कारवाई व्हावी...आम्हा सर्वांना कोरोणाला हरवायचे आहे.तेच ध्येय घेवून ३८वर पारा असतानाही भर उन्हात आशा कार्यरत आहेत. मात्र तांबेकर सारखे गुन्हेगार कोरोणा ला साथ देत आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा जिल्ह्यातील सर्व आशा आपले काम बंद ठेवून या हल्ला झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा इशारा जिल्हा संघटक नेत्रादीपा पाटील यांनी दिला आहे