म्हाकवे : महापुरात वेदगंगा नदीकाठावरील अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. तसेच नदीजवळच्या विहिरीवरील मीटरपेटया बुडाल्याने ही सर्व मीटर बंद पडली आहेत. मात्र अद्याप याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेतीला पाणी देणे अशक्य बनले आहे. त्यामुळे या खांबांसह शेतकऱ्यांच्या मीटरची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वेदगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी सोनगे येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यामध्ये, महापुरात बुडालेली मीटर बदलून मिळावीत, २०१९ मधील पुरापासून बंद असणारी मीटरची वीज आकारणी ही सरासरीनुसार केली आहे, ती न परवडणारी आहे. त्यामुळे बंद मीटर बदलून मिळावीत अन्यथा यापुढे वीजबिले भरणार नसल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
निवेदनावर कुरूकलीचे सरपंच दिनकर कुंभार, जयवंतराव पाटील, विवेक कांबळे, गिरीश पाटील, संजय पाटील, शिवाजी पाटील, मनोहर पाटील, विलास पाटील, विष्णू पाटील, रवी पाटील, शामराव पाटील, राजू बाचणकर, बाळासोा पाटील, पंडित पाटील, जयदीप बेलवळेकर, तानाजी पाटील, आनंदा पाटील, युवराज पाटील आदी शेतकऱ्यांची नावे आहेत.
कॅप्शन
वेदगंगा नदीकाठावरील पुराने कोसळलेले खांब व मीटरच्या दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन सोनगे येथील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना देताना शेतकरी व ग्रामस्थ.