शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

..म्हणून माजी मंत्री हसन मुश्रीफांनी घेतल्या दोन म्हैशी, शेतकऱ्यांनाही केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 4:47 PM

..त्यांना उत्तर द्यायचे असेल तर म्हैशीचे दूध उत्पादन वाढ करावीच लागेल

कागल : महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामविकास आणि कामगार मंत्रिपदाची यशस्वीपणे धुरा सांभाळलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी दोन नव्या मुऱ्हा जातीच्या म्हैशी खरेदी केल्या. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघात आयोजित कार्यशाळेत गोकुळ दूध संघाच्या संचालक व कर्मचाऱ्यांना दूध उत्पादन वाढीसाठी नवीन म्हशी घेण्याचे व त्याची सुरुवात स्वतःपासूनच करण्याचे आवाहन मुश्रीफ यांनी केले होते. या उपक्रमाची सुरुवात मुश्रीफांनी स्वतःपासून सुरु करत दोन नवीन म्हैशी घेतल्या.मुश्रीफ यांनी  या दोन म्हैशी खरेदी केल्यानंतर त्यांच्या गोठ्यात दहा म्हैशी झाल्या आहेत. या म्हैशींचे स्वागतही त्यांनी केले. त्यांनी म्हैशी खरेदी करून म्हैस दूध उत्पादन वाढविण्याचे आवाहन यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व दूध उत्पादकांना केले.आमदार मुश्रीफ म्हणाले की, अमूल दूध संघाने नाशिकमध्ये नुकतीच ८५० एकर जमीन घेतलेली आहे. तिथे ते म्हशीचा प्रकल्प उभारणार आहेत. तिथे उत्पादित म्हैशीचे दूध मुंबई बाजारात आणून गोकुळचे मार्केट ताब्यात घेण्याचा त्यांचा डाव आहे. अमूलसारखा एवढा मोठा प्रकल्प आम्ही उभा राहू शकत नाही. परंतु; त्यांना उत्तर द्यायचे असेल तर म्हैशीचे दूध उत्पादन वाढ करावीच लागेल. गोकुळच्या दूध उत्पादकांची संख्या पाच लाखावर आहे. त्यापैकी चौथाई म्हणजे सव्वा लाख शेतकऱ्यांनी फक्त एक -एक म्हैस जरी घेतली तरी अमूलचे आव्हान परतवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफGokul Milkगोकुळ