बाळूमामा फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वीही २००३ ते २०२० अखेर १,४९२ रक्तदात्यांचे रक्तदान, ४२५ गरजू लोकांना पुरवठा, बाळूमामा भंडारा यात्रेनिमित्त १५ वर्षे भाविकांना मोफत अन्नछत्र, सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन, अशा व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरव, ताक- कण्या प्रसादाचे वाटप केले आहे.
यावेळी फाउंडेशनचे प्रकाश खापरे, सागर पाटील, सातव पाटील, गुंडोपंत पाटील, शिवप्रताप पाटील आदी उपस्थित होते. गारगोटी येथे बाळूमामा फाउंडेशनमार्फत कोविड सेंटरमध्ये बिर्याणी वाटपप्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर, वैद्यकीय अधिकारी मिलिंद कदम, कृषी सहायक स्वप्नील येरावाड, सागर पाटील, फाउंडेशन अध्यक्ष विजयराव गुरव, प्रकाश खापरे, चंद्रकांत पाटील, राजेश कांबळे, नीलेश वास्कर आदी.
फोटो ओळी :
गारगोटी येथील कोविड सेंटरमध्ये बाळूमामा फाउंडेशनतर्फे कोरोना रुग्णांना शाकाहारी बिर्याणीच्या वाटपप्रसंगी आमदार प्रकाशराव आबिटकर, वैद्यकीय अधिकारी मिलिंद कदम, कृषी सहायक स्वप्नील येरावाड, सागर पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष विजयराव गुरव, प्रकाश खापरे आदी.