कोल्हापूर : येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली. लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त नात रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं या नावाने आयोजित रक्तदान शिबिरात त्यांनी रक्तदान केले. पोलीस परेड मैदानाजवळील अलंकार हॉलमध्ये शिबिर झाले.कोरोना महामारीमुळे रक्ताची गरज भासत आहे. यामुळे लोकमततर्फे रक्तदान शिबिर घेतले जात आहेत. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाजातील सर्वच घटाकातील लोक रक्तदानासाठी पुढे येत आहेत. लोकमतच्या पुढकाराने अंलकार हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्याहस्ते झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.शिबिरात शहर वाहतूक आणि मुख्यालयात पोलीस कर्मचारी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती. रांग लावून रक्तदान करण्यात आले. ते उस्फुर्तपणे रक्तदान करताना दिसत होते. पोलीस कर्मचारी सुरेश शिवाप्पा घेजी, बाबु कुमान्ना जोशीलकर, सिकंदर आब्बास देसाई, तानाजी लक्ष्मण सुंबे, पल्हाद यशवंत देसाई यांना प्रातिनिधीक स्वरूपात लोकमततर्फे रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे यांच्याहस्ते देण्यात आले.सीपीआर रूग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय विभागीय रक्त केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आसमा मुल्ला, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुवर्णसिंग चव्हाण, रमेश सावंत, प्रयोगशाळा सहायक सतीश सुतार, अधीपरिचारक रणजित केसरे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते राजू नडगिरे, परिचर अस्लम मुल्ला, राहूल धनवडे, अरविंद पाटील, अश्विनी पवाळकर, अविनाश पवाळकर, अमृता कांबळे, अस्लम मुल्ला यांनी रक्तदान शिबिरास मदत केली.४० किलोमीटरवरून येवून केले रक्तदानदिगंबर मुरलीधर किल्लेदार, सुजाता दिगंबर किल्लेदार या दांम्पत्याचा मुलगा कैवल्य याचा आज आठवा वाढदिवस. यानिमित्त त्यांनी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लोकमततर्फे अलंकार हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे त्यांनी लोकमत पेपरमध्ये वाचले. ते आपले गाव मजरे कासारवाडा (ता. राधानगरी ) या गावातून ४० किलोमीटरचे अंतर पार करून येत रक्तदान केले. मुलाच्या वाढदिवसानिमित्त वडील दिगंबर, आई सुजात यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली. यापूर्वीही दिंगबर यांनी २३ वेळा रक्तदान केले आहे. किल्लेदार कुटुंब वारकरी संप्रदाय जपणारे आहे.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जपली सामाजिक बांधीलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2021 3:56 PM
Lokmat Event Blood Bank kolhapur : कोल्हापूर येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली. लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त नात रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं या नावाने आयोजित रक्तदान शिबिरात त्यांनी रक्तदान केले. पोलीस परेड मैदानाजवळील अलंकार हॉलमध्ये शिबिर झाले.
ठळक मुद्देशहर वाहतूक नियंत्रण शाखेने जपली सामाजिक बांधीलकीलोकमत रक्तदान शिबिराला प्रतिसाद, केले रक्तदान