येथील श्री भरत बँकेची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. अशोक रुणवाल म्हणाले, बँकेस ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. गतसालच्या ठेवीमध्ये १७ कोटी ४२ लाखांनी वाढ होऊन एकूण ठेवी १८५ कोटी ३ लाख इतक्या झाल्या, तर कर्जामध्ये ५ कोटी ९६ लाखांची वाढ होऊन चालू आर्थिक वर्षात १०२ कोटी ७१ लाख कर्जे वाटप केली आहेत. सभासदांना ११ टक्के लाभांश संचालक मंडळाने देण्याचे जाहीर केले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष डॉ. श्रीवर्धन पाटील यांनी बँकेकडून सुरू असलेल्या योजनांचा आढावा विषद केला. सभेस संचालक, सभासद उपस्थित होते.
फोटो - २६०९२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील भरत बँकेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले.