शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

सोशल मीडिया साडीच्या डिझाईनमध्येही

By admin | Published: September 15, 2014 11:06 PM

प्रभाव : साड्यांवर फेसबुक, गुगल, व्हॉटस्अ‍ॅप, हैक, याहू अशा अ‍ॅप्लिकेशनचे सिम्बॉल डिझाईन

अतुल आंबी - इचलकरंजी -आजकाल सर्वच क्षेत्रांत सोशल मीडियाने शिरकाव केला आहे. मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब या माध्यमांतून वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅप्लिकेशनचे सिम्बॉल आता साडीवर वापरून डिझाईन तयार करण्यात आले आहे. येथील साडी दुकानात अशा विविध डिझाईनच्या साड्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.सध्या अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल असणे म्हणजे आपण अपडेट आहोत. त्याचबरोबर नेहमी जगाच्या संपर्कात आहोत, असे मानले जाते. वेगवेगळ्या क्षेत्रांत व्हॉटस् अ‍ॅप, हैक, व्हायबर अशा अ‍ॅप्लिकेशनचा कामासाठी चांगल्या प्रकारे वापर केला जात आहे. उद्योजक आपल्या फॅक्टरीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कधीही, कोठेही आपल्या फॅक्टरीमध्ये कोणत्या विभागात काय-काय चालले आहे, हे बघू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही मालक आपल्यावर नेहमी नजर ठेऊन असतात, हे माहीत असल्याने कामात कुचराई करता येत नाही. वृत्तपत्र क्षेत्रातही अशा अत्याधुनिक अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून फोटो, जाहिराती, माहिती घेणे अतिशय सोपे बनले आहे. याबरोबरच अनेक क्षेत्रांत वेगवेगळ्या पद्धतीने मोबाईल व टॅबवरील विविध अ‍ॅप्स्मुळे काम सोपे बनले आहे. गत लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. साडी बनविणाऱ्या कंपन्यांनीही मागे न राहता एक वेगळे आकर्षण म्हणून अशा अ‍ॅप्स्चे सिम्बॉल असलेल्या साड्या डिझाईन करून विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. या साड्यांवर फेसबुक, गुगल, व्हॉटस्अ‍ॅप, हैक, याहू अशा अ‍ॅप्लिकेशनचे सिम्बॉल डिझाईनमध्ये वापरण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या अशा डिझाईनच्या साड्या वेगळे आकर्षण बनत आहेत.