शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

अडीच लाखांचा लग्न खर्च सामाजिक कार्याला

By admin | Published: May 01, 2017 12:41 AM

अडीच लाखांचा लग्न खर्च सामाजिक कार्याला

कोल्हापूर : हुंडा प्रथेला विरोध तसेच लग्नातील वारेमाप खर्चाला फाटा देत मुंबई पोलिस कल्याण निधीसह अन्य सामाजिक कार्याला सुमारे अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन पोलीस उपनिरीक्षक डॉ. मनोज व सरिता पाटील या नवदाम्पत्याने अनोख्या पद्धतीने आदर्शवत असा विवाह साजरा केला. मनोज महिपती पाटील (रा. देवाळे, ता. पन्हाळा) हे सध्या मुंबई येथील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक आहेत. त्यांचे इचलकरंजी येथील सरिता यांच्याशी लग्न ठरले. सरिता ह्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली येथे कार्यरत आहेत. दोघेही पोलीस उपनिरीक्षक पदावर असल्याने लग्न राजेशाही थाटात करण्याचा पै-पाहुण्यांचा आग्रह होता; परंतु या दोघांनीही पारंपरिक पद्धतीला फाटा देत २८ एप्रिल रोजी अतिशय साध्या पद्धतीने नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील दत्तमंदिराशेजारील छोटेखानी हॉलमध्ये लग्न केले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवून समाजातील एकोपा टिकून राहावा, असा संदेश दिला. भोजन, मिरवणूक, मंडप, मानपान यासारखा अनावश्यक खर्च टाळून लग्नकार्यास येणाऱ्या खर्चाची रक्कम सामाजिक कार्यास मदत स्वरूपात देऊन या नवदाम्पत्याने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. ज्या गावात लहानाचे मोठे झालो, शिकलो तेथील ऋणानुबंध जपण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांना ५५ हजार, पोलीस कल्याण निधी मुंबईसाठी ५० हजार, ‘नाम फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेस ५० हजार, गावातील ग्राममंदिर व जलसंधारण योजनेसाठी ४० हजार, पाटणे (ता. शाहूवाडी) येथील वाचनालयास पाच हजार अशी मदत केली. लग्नकार्यास आलेल्या पाहुण्यांना झाडाचे रोप देऊन पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवण्याचा संदेशही द्यायला ते विसरले नाहीत. (प्रतिनिधी)