कोल्हापूर : कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील भाजी मार्केट, मुख्य चौक व वर्दळीच्या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.
उपायुक्त निखिल मोरे यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने चार ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ऋणमुक्तेश्वर भाजी मार्केट, रेसकोर्स भाजी मार्केट, राजारामपुरी भाजी मार्केट, पाडळकर मार्केट, शिंगोशी मार्केट, कपिलतीर्थ मार्केट, कसबा बावडा मार्केट, रंकाळा बसस्टँड, संभाजीनगर बसस्टँड, महाद्वार रोड, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसर, शाहूपुरी, करवीर, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईड या औषधाची फवारणी करण्यात आली.
फोटो क्रमांक - ११०४२०२१-कोल-केएमसी०२
ओळ - कोल्हापूर शहरात महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने रविवारी शहराच्या विविध भागांतील भाजी मंडईतून औषध फवारणी करण्यात आली.