कोल्हापूर : दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय वाहिनी सुरू झालेल्यालिटिल चॅम्प्स या गायनाच्या रिॲलिटी शोसाठी कोल्हापूरच्या सोहम जगताप याचे संतूरवादन ऐकण्याची रसिकांनी पर्वणी मिळणार आहे. तो लहान गायकांना संतूर वादनाची साथसंगत करत असून गेल्या दोन दिवसांपासून या शोचे प्रक्षेपण सुरू झाले आहे.
सोहम हा प्रसिद्ध बासरीवादक प्रा. सचिन जगताप यांचा मुलगा असून त्याने वयाच्या ४ थ्या वर्षापासून वडिलांकडे बासरीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पुढे १३ व्या वर्षी त्याने पंडित उल्हास बापट यांच्याकडे संतुरवादन शिकायला सुरु केले. सध्या तो वरदा खाडिलकर यांच्याकडे धडे घेत आहे. त्याचा पहिला शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम वयाच्या १५ व्या वर्षी दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे झाला होता ज्याला संगीतकार अशोक पत्की, गायिका पद्मजा फेणाणी उपस्थित होत्या. तो क्रोमॅटिक संतूरवादक असून शंभर तारा स्वत: ट्यून करून वाजवतो.
--
फोटो नं २६०६२०२१-कोल-सोहम जगताप
---