कागल येथील शाहू सभागृहात झालेल्या आजी-माजी सैनिक समाजसेवी असोसिएशन कार्यालय उद्घाटन व सैनिकांचा पालिकेने भरलेल्या घरफाळा पावत्यांचा वितरण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. यावेळी मेजर जनरल एम. एन. काशीद प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, ज्या भागात किमान शंभर किंवा त्यापेक्षा जास्त आजी-माजी सैनिक असतील त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यास सैनिक भवन उभारणार असून, माझ्या कारकिर्दीत जे सैनिक शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना मी मदत करीत आलो आहे. त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजानेही पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या परिवाराला स्थानिक पातळीवर कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी जबाबदारी घ्यावी असा माझा प्रयत्न राहील.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी मनोगत व्यक्त केले. कर्नल विलास सूळकुडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संघटनेचे उपाध्यक्ष कुंडलिक तिप्पे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, मुख्याधिकारी पंडित पाटील, संजय चितारी, प्रवीण काळबर, बाबासो नाईक, आदींसह नगरसेवक, तसेच माजी सैनिक व त्यांचे त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
----------------------