कृषिमंत्री भुसे कोल्हापुरात आले असता शिवसेना जिल्हा प्रमुख पवार व देवणे यांनी त्यांची भेट घेतली व कोल्हापुरी गूळ उद्याेगापुढील समस्या त्यांच्याकडे मांडल्या. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, प्रकाश पाटील, संभाजी पाटील उपस्थित होते.
गूळ उत्पादनाचे आधुनिकीकरण, मूल्यवर्धित उत्पादन करणे, आकर्षक वेस्टन करणे, प्रभावी जाहिरात करणे, सेंद्रिय गुळाच्या उत्पादनास प्रोत्साहन देणे, गुळापासून विविध उपपदार्थ, उत्पादने तयार करणे, गुळाची निर्यात करणे, गुळासाठी ब्रॅंड ॲम्बॅसडर नेमणे, क्लस्टर करणे, शेतकरी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे, कौशल्यवृद्धी करणे, आदी समस्या कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ उद्योगासमोर आहेत. या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी ११५० गुऱ्हाळघरे कार्यरत होती. परंतु, अनेक समस्यांमुळे ही संख्या घटत जाऊन सध्या ४०० पर्यंत आली आहे. गुळामध्ये जिल्ह्यातून ५०० ते ७०० कोटी रुपयांची उलाढाल होते. एका गुऱ्हाळघरासाठी २२ ते २५ कर्मचारी लागतात. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्माण होण्यास गूळ उद्योग अत्यंत उपयुक्त आहे, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
फोटो क्रमांक - २६०९२०२१-कोल-शिवसेना
ओळ - कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ उद्योगासमोरील समस्यांचे निवेदन शिवसेना प्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी रविवारी कृषिमंत्री दादा भुसे यांना दिले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, प्रकाश पाटील, संभाजी पाटील उपस्थित होते.