लोकमत न्यूज नेटवर्क
उचगाव : पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत होणाऱ्या सहापदरीकरण रस्त्याच्या कामात उजळाईवाडीकरांना भेडसावणारे प्रश्न सोडवा अशी मागणी उजळाईवाडी ग्रामस्थांनी
पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली. पालकमंत्र्यांसह खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील यांनी नुकतीच सहापदरीकरण कामासंदर्भात रस्त्याची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी समस्यांचा पाढाच वाचला. सहापदरीकरण रस्त्याच्या कामावेळी
गावातील रस्त्याला महामार्गाला जोडण्यासाठी उजळाईवाडी विमानतळ रोडवरील ब्रीजची लांबी-रुंदी, उंची वाढवा, या ठिकाणी चारही बाजूंनी जंक्शन
करा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासमोरून येणाऱ्या पाणंद रस्ता ते गावविहीर या दरम्यान नव्याने भूमिगत ब्रीज तयार करा, गावच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रस्ते करा, असोबा मंदिरकडे जाणाऱ्या ब्रीजची रुंदी-लांबी वाढवा, उड्डाण पुलावर संरक्षक कवच निर्माण करा अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी सरपंच सुवर्णा माने, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटील, ग्रामविकास
अधिकारी बाबासाहेब कापसे, काका पाटील, संजय माने, राजाराम माने, नारायण
माने, नायकू बागणे, उत्तम आंबवडे, नंदकुमार मजगे, संदीप पोवार, संपत दळवी, महेश
मचले, विनायक भानुसे, बाळू पुजारी, विश्वास पाटील, राजू गवाळकर प्रकाश
मेटकरी, डी. जी. माने, राजू माने, एकनाथ माने उपस्थित होते.
फोटो : ०१ उजळाईवाडी
पुणे
-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करताना उजळाईवाडी गावातील
सर्व्हिस रस्ते,ब्रीज, सांडपाणी गटर्स, जंक्शन करा अशी मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली.