पदवीधर पशुधन पर्यवेक्षक यांनी केलेल्या तक्रारीवरून निमशासकीय पशुधन पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील निमशासकीय पशुधन पर्यवेक्षक यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे
कागल तालुक्यातील निमशासकीय पशुधन पर्यवेक्षक संघटनेच्यावतीने याबाबतचे निवेदन घाटगे यांना देण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
घाटगे म्हणाले की, प्रत्येक शेतकऱ्यांच्या गोठ्यात दिवसा व रात्रीच्या वेळी देखील जाऊन जनावरांची देखभाल हे पर्यवेक्षक घेतात. लाळखुरकतसारख्या महाभयंकर आजारातदेखील हे पर्यवेक्षक मनोभावे जनावरांची सेवा करतात. मात्र, त्यांच्या या कामकाजावर मर्यादा घालून त्यांना बेदखल ठरवत त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याच्या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे घाटगे यांनी सांगितले.
या वेळी कागल तालुका पशुधन पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष विनायक जगदाळे, पशुधन पर्यवेक्षक सागर पाटील, सुनील माने, तुकाराम कासोटे, सूर्याजी लोखंडे, सागर जाधव, खंबाजी पाटील, भगवान पाटील, सुंशात पाटील, बाजीराव पाटील, राम सावेकर, सिद्धार्थ कांबळे व कागल तालुक्यातील इतर पशुधन पर्यवेक्षक उपस्थित होते.