रवींद्र येसादे ।उत्तूर : गेली चार दशके भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी गावातील गट-तट, हेवेदावे बाजूला ठेवून महागोंड (ता. आजरा) येथील मुंबईकर व पुणेकर मंडळी, गावकरी एकत्र आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून श्रमदानातून या पाणीप्रश्नासाठी झटत आहेत. ग्रामस्थांनी आंबेओहळचे १ कि.मी.चे पात्र गाळाने पूर्ण भरले होते ते गावकऱ्यांनी श्रमदानाने स्वच्छ केल्याने पावसाळ्यानंतर ग्रामस्थांना मुलबक पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. गावाशेजारीच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरणार आहे.
गावातून नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, कोकण या विभागातील नोकरदार मंडळी गेले दोन महिने एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करीत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरदार मंडळी पुणे, मुंबई येथे बैठकीस हजर झाली. बैठकीस १५ कलमी आराखडा गावच्या विकासासाठी तयार करण्यात आला. त्यानंतर गावात ग्रामस्थांशी संवाद साधून गावात राजकारणविरहित गावसभा उत्साहात पार पडली.
जेथून पाणीसाठा करावयाचा आहे तेथे जलअभियंत्यांकडून पाहणी करण्यात आली. कृषी विभागानेही ग्रामस्थांचे काम पाहून ग्रामस्थांशी सहकार्याची भूमिका घेतली. सर्वांनी गावच्या हितासाठी एकत्र राहण्याचे ठरले. गावकºयांचे प्रबोधनही सभा घेऊन करण्यात आले. गावास पाण्याचे महत्त्व समजल्यावर महिलाही कामासाठी सरसावल्या.
गावच्या आंबेओहळ पात्रानजीक असणाºया सार्वजनिक नळपाणी योजनेशेजारी ग्रामस्थांनी गाळांनी साचलेले २० फूट रुंद व १० फूट उंच पात्र श्रमदान व जेसीबीने ४० वर्षांत पहिल्यांदाच खुले केले. वझरे भागातून या पात्रात मोठे पाणी वाहून पावसाळ्यात येते. बंधाºयात पाणीसाठा झाला तर जॅकवेलला पाणीसाठा होईल. शेजारी असणाºया कूपनलिकेच्या पाणीसाठ्यातही वाढ होईल.
सध्या या कूपनलिकेचा आधार ग्रामस्थांना घ्यावा लागतो. कूपनलिकेचे पाणी जॅकवेलमधून सोडून ते दोन-तीन दिवसांतून एकदा सार्वजनिक नळांना दिले जाते. यावर उपाय म्हणून ग्रामस्थ एकत्रित येत काम सुरू केले. आंबेओहळ पात्र खुले झाल्याने जून महिन्यातच पाणीसाठा होणार आहे.पहिल्या टप्प्यातील ही कामे पाणी प्रश्न महत्त्वाचा असल्याने ग्रामस्थांसह मुंबई व पुणेकर मंडळींनी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा गाळमुक्त केला. जॅकवेल दुरुस्ती व गावतलावाची डागडुजी ही महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत.जलयुक्त शिवार योजना राबविणारशासनाने महागोंड गावास जलयुक्त शिवार योजना दिल्यास ती पूर्ण क्षमतेने राबवून गावास जलसमृद्धी करण्याची योजना गावकºयांनी आखली आहे. यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन ही योजना मंजूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.