सातवेळा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून आदर्श निर्माण करणाऱ्या या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी पंचकमिटी कार्यरत आहे. वाॅर्डनिहाय घरोघरी जाऊन बाहेरून कोणी आले आहे का? याची पाहणी करून प्रशासनाच्या नियमाची माहिती देत त्याचे पालन करण्याची विनंती केली जात आहे.
तसेच चार हजार लोकसंख्या असतानाही शिक्षक,आशा,अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक याचा समावेश असणारे पाच गट तयार करून घर टू घर माहिती संकलित केली जात आहे.
दरम्यान,ग्रामसमितीचे योगदान आणि जबाबदारी विभागल्यामुळे आमच्यावरील ताण कमी झाल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले.
कोट....
"कोरोनाची लाट थोपविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या गावापासून सुरुवात केली तरच या संकटावर मात करता येणार आहे.या जाणिवेतून येथील ग्रामसमितीचे सर्व सदस्य योगदान देत आहेत.तर गावकऱ्यांचाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
सुनील घोरपडे,
सरपंच, सोनगे