कागल तालुक्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे सोनगे कोरोना दक्षता समितीने सर्व यंत्रणेच्या सहकार्याने यावर नियंत्रण आणले. यासाठी झोकून देऊन आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या कोरोना योद्धयांचा ग्रामपंचायतीच्या वतीने गौरव करण्यात आला. प्रशस्तीपत्र,शाल,श्रीफळ असे सत्काराचे स्वरूप होते.तसेच, यांना सॅनिटायझर,हॅण्डग्लोज,फ़ेस मास्क किट, प्रतिकार शक्ती वाढवणारे औषधे ही भेट देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनील घोरपडे होते.
कोरोनाच्या महामारीच्या काळातही दररोज घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी,आशा,शिक्षक,आरोग्य सेवक,सेवा देणारे डॉक्टर,मेडिकल दुकानदार,ग्रामपंचायत कर्मचारी,पत्रकार यांचा सत्कार झाला.
प्रास्ताविक भरत कांबळे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य,दक्षता समिती,प्रमुख मंडळीसह तरुण मंडळाचे सदस्य,,ग्रामस्थ उपस्थित होते. साताप्पा कांबळे यांनी आभार मानले.