समीर देशपांडे
कोल्हापूर : वयाच्या पस्तिशीमध्ये त्यांना पार्किन्सनचा आजार झाला. केवळ हाताला किंवा मानेला कंप नाही; तर संपूर्ण शरीरच गदगद हलू लागले. ऐन उमेदीत एखादा खचला असता; परंतु कोल्हापूरच्या श्रीनिवास संगोराम यांनी जिद्द काय असते ते दाखवून दिले आहे. अशाही स्थितीत हा माणूस गाणी म्हणतो, नृत्य करतो, कविता करतो आणि गीतगायनाचे कार्यक्रमही सादर करतो. क्षुल्लक कारणांपायी आयुष्याला नावे ठेवणाऱ्यांना संगोराम यांचेजगणे खरोखरच मार्गदर्शक ठरणारे आहे.
संगोराम मूळचे निपाणीचे. आजरा अर्बन, आवाडे जनता सहकारी बँक आणि यूथ बँकेत त्यांनी वयाच्या ५६ व्या वर्षांपर्यंत नोकरी केली. वयाच्या ३५व्या वर्षी त्यांना या आजाराने गाठले. परंतु, त्याही काळात त्यांनी आपली नोकरी पूर्ण केली. आज त्यांचे वय ६७ आहे; परंतु या आजारामुळे ते एका ठिकाणी स्वस्थ बसू शकत नसतानाही त्यांनी केवळ आपल्या छंदाच्या जोरावर आपले आयुष्य अधिक सुरेल बनवले आहे. त्यांनी २३०० कवितांची रचना केली आहे. संगोराम यांनी हातात पेटी घेऊन यातील ५० हून अधिक कवितांना चालीही लावल्या आहेत. आजही भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, सुधीर फडके यांच्यासह अनेक गायकांची गाणी त्यांना पाठ आहेत. आजही ते उत्तम पद्धतीने गाण्यांचे आणि कवितांचे सादरीकरण करतात.अनेक स्वयंसेवी संस्था त्यांनामुद्दामहून कार्यक्रमाला निमंत्रित करतात.गाणी सादर करणे, एखादे नृत्य, एखाद्या नाटकातील प्रसंग सादर करीत आजही संगोराम आपल्या या कंप पावणाºया शरीराच्या वेदना विसरतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाºया संगोराम यांना रसिकांची दादहीतशीच मिळते. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त बाहेर असतो; परंतु पत्नीची त्यांना समर्थ साथ लाभली आहे.या सगळ्यांचे कोणत्याना कोणत्या पातळीवर चीज व्हावे, या कविता रसिकांपर्यंत पोहोचाव्यात,हीच आता अपेक्षा आहे.- श्रीनिवास संगोराम, कोल्हापूर