कोल्हापूर : पेन्शनचा लाभ न मिळालेल्या ४० वर्षांच्या आतील देवदासींना श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाचे व वयाचे दाखले देण्यासाठी शिबिर घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी देवदासींच्या प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात देवदासींच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दौलत देसाई होते. प्रमुख उपस्थिती आमदार चंद्रकांत जाधव, नेहरू युवा देवदासी विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक भंडारे, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, किशोर घाटगे, बाबा इंदुलकर, उदय पोवार, मायादेवी भंडारे, आदींची होती.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ न मिळालेल्या देवदासींना या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल. यासाठी आवश्यक वयाचे उत्पन्नाचे दाखले देण्यासाठी लवकरच विशेष शिबिर आयोजित केले जाईल. यावेळी रेखा वडर, शांताबाई पाटील, यल्लव्वा कांबळे, शारदा काळे यांच्यासह देवदासी उपस्थित होत्या.