कोल्हापूर : शहरातील राजोपाध्येनगर बॅडमिंटन हॉल येथे ४४ बेडचे तर लक्षतीर्थ वसाहत येथे २७ बेडचे कोरोना केअर सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरची बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी करून तातडीने फायर तसेच इलेक्ट्रिसिटी ऑडिट करून घेण्याच्या सूचना दिल्या.
महानगरपालिकेची सध्या १३ कोविड केअर सेंटर्स कार्यरत असून त्याठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू झाले आहेत. दुधाळी येथील कोविड सेंटरसुद्धा लवकरच सुरू केले जाणार आहे.
राजोपाध्येनगर येथे ३२ ऑक्सिजन बेड व १२ नॉन ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आलेली आहे. तर लक्षतीर्थ वसाहत येथे २७ ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आलेली आहे. याठिकाणी महापालिकेच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. येथे स्टाफ नियुक्तीची कारवाई सुरू असून लवकरच हे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नारायण भोसले, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी, अनिरुद्ध कोरडे, विवेक चव्हाण उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १९०५२०२१-कोल-केएमसी०१
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने राजोपाध्येनगर व लक्षतीर्थ वसाहत येथे कोविड केंद्र सुरू केले जाणार आहे. बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी या केंद्रांची पाहणी केली. यावेळी नितीन देसाई, नारायण भोसले, एन.एस. पाटील, महादेव फुलारी उपस्थित होते.