शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

बुधले, जाधव यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय

By admin | Published: February 09, 2015 12:30 AM

उद्यम सोसायटी निवडणूक : तेंडुलकर यांच्या ‘लोकशाही प्रेरित’ पॅनेलचा धुव्वा; अध्यक्ष, उपाध्यक्ष पुढील आठवड्यात

कोल्हापूर : विकासाभिमुख कामकाजाची ग्वाही देत सभासदांचा ‘कौल’ आपल्याकडे वळविणाऱ्या दिनेश बुधले व चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू प्रेरित सत्तारुढ-युवा उद्योजक पॅनेलने कोल्हापूर उद्यम को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ जागांवर रविवारी दणदणीत विजय मिळविला. सभासदाभिमुख कामकाजाचे वचन देत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उतरलेल्या रवींद्र तेंडुलकर यांच्या लोकशाहीप्रेरित पॅनेलचा धुव्वा उडाला. सभासदांनी यातून ‘सब कुछ’ सत्तारुढ पॅनेल हे दाखवून दिले. विजयी झालेल्यांमध्ये सात नवीन चेहऱ्यांना सोसायटीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.असोसिएशनच्या २०१५-१९ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात जोरदार प्रचार केला. सोसायटीच्या इतिहासात यावर्षीच्या निवडणुकीत सर्वाधिक ४१८ इतके मतदान झाले. मतदान अधिक झाल्याने सत्तांतर होईल, असा अनेकांनी व्यक्त केलेला अंदाज मतदारांनी चुकीचा ठरविला. उलट, सत्तारुढांच्या ‘राजर्षी शाहू प्रेरित’चे सर्व उमेदवारांना निवडून दिले. विजयी उमेदवार असे (कंसात मिळालेले मतदान) - कारखाना मतदारसंघ : संजय अंगडी (२६६), हिंदुराव कामते (२२७), प्रकाश चरणे (२८२), चंद्रकांत चोरगे (२३०), अशोक जाधव (२०७), चंद्रकांत जाधव (२६६), दिनेश बुधले (२२१). सोसायटी मतदार संघ : नितीन वाडीकर (३१८). इतर मागासवर्गीय सदस्य : अशोक सुतार (२१६). महिला राखीव : वृषाली कुलकर्णी (२३६), संगीता नलवडे (२७६). राजन सातपुते (अनुसूचित जाती जमाती गट) आणि चंद्रकांत मुळे (भटक्या विमुक्त गट जाती व विशेष मागास प्रवर्ग) यांची बिनविरोध निवड झाली. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान झाले. त्यानंतर सात वाजता मतमोजणी पूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीन माने, तर साहाय्यक म्हणून मिलिंद ओतारी, उदय उलपे, प्रकाश महाडिक यांनी काम पाहिले. पुढील आठवड्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व खजानिस आदींच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे. या निवडीकडे ुकोल्हापूरच्या उद्योगजगताचे लक्ष असणार आहे. (प्रतिनिधी)