शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

कानडी मातृभाषिक मुलांसाठी विशेष उपक्रम !

By admin | Published: June 18, 2015 12:05 AM

‘मराठी’ समृद्धीचा प्रयत्न : ‘गडहिंग्लज’मध्ये २६ शाळेत प्रयोग

राम मगदूम - गडहिंग्लज -मातृभाषा ‘कानडी’ असणाऱ्या मुलांना शाळेची गोडी लागावी व त्यांची ‘मराठी’ भाषा समृद्ध व्हावी यासाठी यंदापासून गडहिंग्लज तालुक्यात विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. २० खेड्यांतील २६ शाळंमध्ये ‘मराठी’च्या विकासासाठी सीमाभागात राबविला जाणारा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील निम्मे लोक कानडी बोलतात. किंबहुना ‘गडहिंग्लज’च्या पूर्वेकडील लोकांची मातृभाषा ही कानडीच आहे. त्यामुळेच या परिसरातील नवागत विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावण्याचे आव्हान शिक्षण खात्यासमोर कायम राहिले आहे. साधारणपणे तालुक्यातील सीमावर्ती खेड्यातील शिक्षकांना अध्यापनावेळी ही भाषिक अडचण भेडसावते. अशा २० खेड्यांतील २६ शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे मिळून ३२०० विद्यार्थी शिकतात. त्यापैकी अप्रगत विद्यार्थींची संख्या १० टक्के म्हणजेच तब्बल ३२० इतकी आहे. त्यांना मराठी लिहिता-वाचता येत नाही. त्याची कारणमीमांसा केल्यानंतर ही समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे. त्यावर उपाय म्हणूनच या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. असा सूचला उपक्रमडॉ. जी. बी. कमळकर ‘गशिअ’ म्हणून गडहिंग्लजला वर्षापूर्वी रूजू झाले. शाळा भेटीच्यावेळी सीमाभागातील ही भाषिक अडचण त्यांच्या निदर्शनास आली. यासंदर्भात संबंधित शिक्षकांची बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. त्यातून या उपक्रमाची कल्पना पुढे आली आहे.‘अप्रगत’चा शिक्का पुसणारकानडी बोलणारी मुलं मराठी शाळेत आल्यानंतर गोंधळून जातात. मुलांची भाषा शिक्षकांना, शिक्षकांची भाषा मुलांना समजत नाही. यासाठी सुरूवातीला काही दिवस मराठीतील अवघड शब्दांचा अर्थ कानडीतून समजावला जाईल. त्यानंतर मराठीवर प्रभुत्व येण्यासाठी खास प्रयत्न केले जातील. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होऊन ‘अप्रगत’चा शिक्का कायमचा पुसला जाईल.५उपाययोजना काय ?पहिल्या वर्गाला शिकविण्यासाठी कानडी भाषा समजणाऱ्या ४० शिक्षकांची नेमणूक.पहिलीच्या वर्गाला शिकविण्याचा हातखंडा असणाऱ्या आजी-माजी शिक्षकांबरोबरच मराठी भाषा तज्ज्ञांची मदत घेणारप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख मिळून पाचजण २६ शाळा दत्तक घेणार.