चंदगड : अतिवृष्टी व महापुरामुळे सर्वस्व गमावलेल्या धुमडेवाडी, निट्टूर, कोवाड, दुडंगे, कुदनूर, राजगोळी, कोनेवाडी, चंदगड येथील पूरग्रस्तांची व शेतकऱ्यांची खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली. पूरग्रस्तासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली असून ते यासाठी पंतप्रधान नरेंद्री मोदी याच्यांशी पत्रव्यवहार करणार आहे. संभाजीराजे म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरुन न येण्यासारखे आहे. शासनाने जाहीर केलेली मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संसार उभे करण्यास पुरेसे ठरणार नाही. त्यामुळे घर पडलेल्या शेतकऱ्यांचा समावेश इंदिरा आवास योजनेत करुन या योजनेतून मिळणारी रक्कम व शासनाकडून मिळणारी रक्कम असा दुहेरी फायदा मिळावा. यासाठी पंतप्रधान नरेंद्री मोदी याच्यांशी पत्रव्यवहार करणार आहे.कोवाड बाजारपेठेची पाहणी करून दुकानाची व मालाची झालेले नुकसान यांचे पचनामे करण्याच्या सूचना शासकिय अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी गोपाळराव पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, ‘गोकुळ’ संचालक राजेश पाटील, योगेश केदार, जि.प. सदस्य अरूण सुतार, कललप्पा भोगण, सरपंच अमोल सुतार, उपसरपंच सचिन पाटील, सरपंच राजू पाटील, (दुंडगे), चंद्रकांत कांबळे, नामदेव सुतार, सरपंच ज्ञानेश्वर गावडे (कोनेवाडी), तानाजी गडकरी, संजय पवार, प्रविण पवार आदींसह पूरग्रस्त उपस्थित होते.