कोल्हापूर : पाच मार्चपर्यंत क्रीडासंकुल उद्घाटनासाठी सज्ज ठेवण्याचा सज्जड दम सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर विभागीय क्रीडासंकुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. विभागीय क्रीडासंकुलामधील फुटबॉल मैदान, टेनिस कोर्ट, ४०० मीटर धावण्याचा मार्ग, खो-खो, कबड्डी ही मैदाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे याच्या हस्ते उद्घाटनासाठी तयार ठेवण्याचे सक्त आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांनी विभागीय क्रीडासंकुलाचे बांधकाम कंत्राटदार सचिन मुळे यांना दिले. या आदेशानंतर कंत्राटदारांनी कामास सुरुवात केली. गुरुवारी फुटबॉल मैदानाच्या कामासाठी विविध प्रकारचे मुरुम, खडी व माती आणण्यात आली आहे; तर टेनिस कोर्ट क्रमांक तीनचे डांबरीकरण करण्यात आले आहे. ४०० मीटर धावण्याच्या मार्गासाठी विटा, मुरूम, माती अशा लेअर करण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच शूटिंग रेंजच्या आतील लाईट फिटिंग, रंगरंगोटी व व्हॉलिबॉल, बॉस्केटबॉलमधील लोखंडी जाळी लावण्याचे काम सुरू आहे. खो-खो, कबड्डी मैदानावरील साफसफाई व सपाटीकरणावर अखेरचा हात फिरविण्यात येत आहे. सातत्याने कामावर वॉचमंत्रिमहोदयांच्या सज्जड इशाऱ्यानंतर संकुलाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, कोणतीही अडचण येऊ नये, चांगल्या दर्जाचे काम व्हावे. याकरिता केल्या जाणाऱ्या कामावर लक्ष देण्यासाठी क्रीडा कार्यालयाचे दोन क्रीडाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सातत्याने कामावर लक्ष ठेवून आहेत.
विभागीय क्रीडासंकुलाच्या कामास गती
By admin | Published: February 12, 2015 11:42 PM