शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

accident in kolhapur: अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने स्पोर्टबाईक चालवत दिली धडक; ६ वर्षीय बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 11:42 AM

अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अल्पवयीन मुलांना बेकादेशीररीत्या मोटरसायकल दिल्या जात असल्याने संतापही व्यक्त होत आहे.

इचलकरंजी : येथील जवाहरनगरमध्ये अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने स्पोर्ट बाईक चालवून एका सहा वर्षाच्या मुलाला जोराची धडक दिली. त्यामध्ये जखमी झालेल्या बालकाचा आज, शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आदित्य अधिनाथ जाधव असे मृत बालकाचे नाव आहे. या अपघातात मोटरसायकलस्वारही जखमी झाला आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अल्पवयीन मुलांना बेकादेशीररीत्या मोटरसायकल दिल्या जात असल्याने संतापही व्यक्त होत आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जवाहरनगर परिसरातून एक अल्पवयीन तरुण स्पोर्ट बाईक घेऊन भरधाव वेगाने निघाला होता. त्यावेळी त्याने आदित्यला जोराची धडक दिली. यात मोटरसायकलस्वार अल्पवयीन मुलगाही जखमी झाला. दोघांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले.जखमी आदित्यला बालकाला आयजीएम रुग्णालय प्रथम उपचार करून कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अपघात करणारा अल्पवयीन तरुण हा मूळचा वडगाव येथील असून तो इचलकरंजीत नातेवाईकांकडे आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातichalkaranji-acइचलकरंजी