शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

निपाणीजवळ भरधाव ट्रकची पाच वाहनांना धडक, सुदैवाने जीवितहानी नाही; वाहतूक विस्कळीत 

By समीर देशपांडे | Published: October 18, 2023 11:53 AM

कोल्हापूर : कर्नाटकातील निपाणी जवळील तवंदी घाटामध्ये भरधाव ट्रकने पाच वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ...

कोल्हापूर : कर्नाटकातील निपाणी जवळील तवंदी घाटामध्ये भरधाव ट्रकने पाच वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये पाचही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आज, बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे तवंदी घाटातील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरी करण्याचे काम सुरू आहे. नेमका वळणावरच अपघात झाल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ठेकेदार कंपनीच्या कामगारांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. यानंतर टप्याटप्प्याने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली. सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनाची संख्या मोठी होती. गर्दीतून रुग्णवाहिका पुढे सोडताना कसरत करावी लागली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातKarnatakकर्नाटक