शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

देवगडवासीय ‘रंगतरंग’ने मंत्रमुग्ध

By admin | Published: January 02, 2015 10:14 PM

किनाऱ्यावर ‘जल्लोष’ : ढोलकीचा ताल, घुंगराच्या आवाजाने किनारा दुमदुमला

देवगड : ढोलकीचा हृदयात भरणारा ठेका, इतर तालवाद्यांचे मंजूळ स्वर व देवगडमधील लावण्यवतींच्या पायातील घुंगरांचा घुमणारा आवाज, लावण्यवतींचे सौंदर्य, शिट्ट्यांचा आवाज, त्याला समुद्राच्या पाण्याची असलेली साथ हे दृष्य पाहून हजारो देवगडवासीय मंत्रमुग्ध झाले. एकापेक्षा एक स्थानिक लावण्यवतींनी केलेल्या लावणीवरील नृत्याला रसिकांचा वाढता प्रतिसाद मिळत होता. देवगड किनाऱ्यावर सादर करण्यात आलेल्या ‘रंगतरंग’ कार्यक्रमाने संपूर्ण देवगडवासीय मंत्रमुग्ध झाले. देवगड येथील ‘जल्लोष २०१५’च्या कार्यक्रमप्रसंगी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सलग पाच वर्षे हा कार्यक्रम येथील व्यापारीवर्गातर्फे आयोजित करण्यात येतो. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दरवर्षी हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. स्थानिकांना कलेची जाण व्हावी, येथे अधिक पर्यटक यावेत या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.मुंबईमधील आॅर्केस्ट्राच्या सूत्रसंचालकांनी मालवणी भाषेत साद घालत रंगमंचावर आगमन केले. त्यांनी आपल्या निवेदनातून रसिकांना विनोदी शैलीत हसविले. आॅर्केस्ट्रामधील कलाकारांनी ‘मोरया मोरया’ गाण्याने रसिकांना मुजरा केला. त्यानंतर एकापाठोपाठ एक नृत्ये सादर करण्यात आली. त्यानंतर देवगडची लावण्यवती सुप्रिया ढोके व तिच्या सहकाऱ्यांनी एकापाठोपाठ एक अशा लावण्या सादर केल्या. देवगडचा गायक नीलेश मेस्त्रीने गायिलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. (वार्ताहर)आतषबाजीने नववर्षाचे स्वागत३१ डिसेंबरनिमित्त देवगड किनाऱ्यावर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ३१ डिसेंबरच्या रात्री फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या तालावर सरत्या वर्षाला देवगडवासीयांनी निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले. या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनीही चोख व्यवस्था ठेवली होती.