* 'संत गजानन' शिक्षण समूह, महागाव
गडहिंग्लज : महागाव (ता. येथील) संत गजानन महाराज शिक्षण समूहातील इंजिनिअरिंग, फार्मसी व आयुर्वेद महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला.
यानिमित्त इंजिनिअरिंग महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते कवी कुसुमाग्रजांचे प्रतिमापूजन करण्यात आले. फार्मसी महाविद्यालयात मराठी ग्रंथपूजा व प्रदर्शन भरविण्यात आले. यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आयुर्वेद महाविद्यालयात प्रतिमापूजन करून विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यातून मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारतीय वैज्ञानिकांचा जागतिक स्तरावरील संशोधनासाठी केलेल्या कार्याचा मनोगतातून उजाळा देण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. एस. जी. किल्लेदार, डॉ. एस. एच. सावंत, डॉ. मंगल मोरबाळे, डॉ. महेश पाटील, डॉ. रवींद्र कुंभार, डॉ. समीर नदाफ, प्रा. संभाजी चव्हाण, प्रा. एस. बी. पोवार, आदींसह शिक्षक उपस्थित होते.
---------------------
देवर्डे प्राथमिक शाळा
पेरणोली : देवर्डे (ता. आजरा) येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नामदेव माईनकर यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कार्यक्रमात सुनील सुतार यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी ‘ही मायभूमी, ही जन्मभूमी', 'महाराष्ट्र गीत- जय जय महाराष्ट्र माझा', 'मराठी अभिमान गीत- लाभले, आम्हांस भाग्य बोलतो मराठी' ही गीते सादर केली.
यावेळी सरोजिनी कुंभार, रेश्मा बोलके यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचा गौरव केला. संयोगिता सुतार, राजेंद्र पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
-------------------------
* न्यू इंग्लिश स्कूल नूल
नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्य जयवंत वडर यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सचिन शिंदे यांनी ‘तुम्ही फक्त लढ म्हणा’ ही कविता सादर केली. यावेळी नीळकंठ कुराडे, श्रीशैल साखरे, आदी उपस्थित होते.
-----------------------
* न्यू इंग्लिश स्कूल, खणदाळ
खणदाळ : येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक एकनाथ देसाई यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी सुनील माने, अण्णासाहेब सुतार, आदी उपस्थित होते. कथाकथन, काव्यवाचन स्पर्धा झाली.
-----------------------
न्यू इंग्लिश स्कूल कौलगे
कौलगे : येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापिका शफिया इनामदार यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीय वेषभूषेत कुसुमाग्रज यांची देशभक्तिपर गीते सादर केली. यावेळी विश्वजित चव्हाण, अरुण येसरे, आदी उपस्थित होते.
-----------------------
* दादा देसाई हायस्कूल, इंचनाळ
इंचनाळ : येथील दादा देसाई हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका सुनंदा होडगे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. भारती पाटील यांनी स्वागत केले. दशरथ राऊत यांनी आभार मानले.