लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांसह तळागाळापर्यंत ‘लोकमत’ रुजला असून सामान्य माणसाच्या मनामनात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच रक्तदान माेहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी काढले.
‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमातंर्गत बालिंगे (ता. करवीर) येथे करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, यामध्ये ते बाेलत होते. यावेळी ४३ रक्त पिशव्या संकलित झाल्या. ‘लोकमत’च्या रक्तदान मोहिमेचे कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळाेखे म्हणाले, राष्ट्रवादीच्या वतीने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी स्वागत केले. ‘लोकमत’ रक्तदान उपक्रमांबाबत ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी माहिती दिली. यावेळी स्वत: शववाहिका चालवून कोरोनाने मृत झालेल्या प्रेतांचे दहन करणाऱ्या प्रिया पाटील, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य शिवाजी देसाई, दयानंद कांबळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल सरचिटणीस सुलतान मुल्लाणी, सेवादल तालुकाध्यक्ष अमर अणकर, करवीर विधानसभा कार्याध्यक्ष गौतम केसरकर, बेलेच्या सरपंच नाजुका पाटील, बालिंगेचे सरपंच मयूर जांभळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ‘लोकमत’चे व्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, भारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वसंतराव जांभळे, करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील, अमोल भास्कर, आकाश भास्कर, सुरेश पाटील, राजाराम कासार, नंदकुमार खाडे, शहाजी जठार, कृष्णात धुंदरे, इंद्रजित पाटील, पंडित कळके, सुनील पाटील, निवास पाटील, संदीप कांबळे, युवराज पाटील आदी उपस्थित होते.
पंडित कळके यांचे ५१ वे रक्तदान
वाकरे येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंडित कळके यांनी ‘लोकमत’च्या शिबिरात ५१ वे रक्तदान केले. ‘लोकमत’ने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक करत आजच्या अडचणीच्या काळात प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे, असे कळके यांनी सांगितले. (फोटो-१००७२०२१-कोल-पंडित कळके)
फोटो ओळी : ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमातंर्गत बालिंगे (ता. करवीर) येथे करवीर तालुका राष्ट्रवादी ्काँग्रेसच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मयूर जांभळे, अमोल भास्कर, राजाराम लोंढे, मधुकर जांभळे, संतोष साखरे, विश्वास पाटील, संभाजी पाटील, अनिल साळोखे, वसंतराव जांभळे, नाजुका पाटील, प्रिया पाटील उपस्थित होते. (फोटो-१००७२०२१-कोल-बालिंगे व बालिंगे०१)