कोल्हापूर : ‘लोकमत’ महामॅरेथॉन’च्या सहाव्या पर्वात कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. येत्या ८ जानेवारी रोजी ही स्पर्धा होत आहे. तीन आणि पाच किलोमीटरची नोंदणी हाउसफुल्ल झाली असून, ही नोंदणी बंद करण्यात आली आहे. दहा आणि एकवीस किलोमीटरच्या नोंदणीसाठी आज बुधवार (दि. ४) अखेरची संधी आहे. इच्छुकांना नोंदणीसाठी आता अवघा एकच दिवस शिल्लक उरला आहे.प्रत्येक धावपटूंना मिळणार आकर्षक टी-शर्ट, गुडीबॅगया स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंना जो आजच्या तरुणाईला भावेल, असा आकर्षक रंगाचा टी-शर्ट, गुडीबॅग, भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व थोर स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांचे चित्र असलेले खास पदक प्रत्येक सहभागी धावपटूला दिले जाणार आहे. याशिवाय ब्रेकफास्ट आणि भरपूर धमाल मनोरंजन. सर्वात महत्त्वाचे म्हणजे १२ लाखांची एकूण बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथाॅनमध्ये सहभागी होण्याचा आनंद लुटा.
लोकांचे आराेग्य चांगले राहावे यासाठी ‘लोकमत’ महामॅरेथाॅनच्या सहाव्या पर्वात सर्वांनी भाग घ्यावा. इंडोकाउंट या स्पर्धेच्या पहिल्या सत्रापासून ‘लोकमत’च्या सोबत आहे. या स्पर्धेत आमचे कर्मचारी, संचालकही धावणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आरोग्याचे महत्त्व लक्षात येईल, यात शंका नाही. या स्पर्धेमुळे व्यायामास प्राेत्साहन मिळेल. ‘लोकमत’ महामॅरेथाॅन ही अत्यंत शिस्तबद्ध, अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. सर्वांनीच या स्पर्धेत सहभागी होऊन धावावे, असे माझे आवाहन आहे. -जितेंद्र मंडपे, जनरल मॅनेजर, एचआर ॲन्ड आयआर, इंडोकाउंट
‘लोकमत’ने आयोजित केलेल्या महामॅरेथाॅनच्या सहाव्या पर्वात आम्ही सहभागी होत आहोत, हा आमच्यासाठी आरोग्याचा आणि आनंदाचा भाग आहे. इंडोकाउंट या मॅरेथॉनच्या आयोजनासाठी ‘लोकमत’ला शुभेच्छा देते आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांनी आपल्या तंदुरुस्तीची चाचणी करावी. -शाहू भोसले, असिस्टंट जनरल मॅनेजर, एचआर ॲन्ड आयआर, इंडोकाउंट
‘लोकमत’ने आरोग्याच्या दृष्टीने महामॅरेथॉन उपक्रम सुरू करून कोल्हापूरकरांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे. आजच्या धावपळीच्या युगात युवक, विद्यार्थी वर्गाने आतापासूनच चांगले आरोग्य जपण्यासाठी व्यायामाची आवड निर्माण करायला पाहिजे. मी स्वतः रोज सकाळी नियमितपणे जिमसाठी जात असतो. चालणे व धावणे याकडे दररोज थोडा वेळ व्यायामासाठी दिला तर ते आरोग्यासाठी चांगले आहे. मी लोकमत महामॅरेथॉनमध्ये गेली ५ वर्षे सहभागी होतो. प्रत्येक वेळेस १० किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केली आहे. याही पर्वातील मॅरेथॉनमध्ये मी सहभागी आहे. -समित कदम, प्रदेशाध्यक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष‘लोकमत महामॅरेथॉन’चा आनंद लुटा‘लोकमत महामॅरेथॉन’ने आता आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन आरोग्यासाठी धावा, स्वत: सहभागी होऊन त्याचा आनंद घ्या. ‘लोकमत’ महामॅरेथाॅन ही अत्यंत शिस्तबद्ध, अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असते, याचा प्रत्यय नेहमी मिळतो. - संजयबाबा घाटगे, माजी आमदार, संस्थापक, श्री अन्नपूर्णा शुगर ॲन्ड जॅगरी वर्क्स लि., केनवडे, ता. कागल.
‘लोकमत’ची महा मॅरेथॉन हा कोल्हापूरकरांसाठी एक आनंद सोहळाच असतो. प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या अंतर गटांत धावता येते. प्रचंड उत्साह आणि ऊर्जेचा स्रोत महा मॅरेथॉनमध्ये पाहायला मिळतो. गेल्यावर्षी याचा अनुभव मी घेतला आहे. याहीवर्षी आम्ही आनंद सोहळ्याचा भाग असणार आहोत. - स्नेहा गिरी, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा.भरपूर बक्षिसे, नेटके नियोजन, प्रचंड उत्साह आणि हजारो स्पर्धकांचा सहभाग यामुळे ‘लोकमत’ची महामॅरेथॉन अविस्मरणीय ठरते. अनेक व्यावसायिक आणि हौशी धावपटू दरवर्षी ‘लोकमत’च्या महामॅरेथॉनची आवर्जून वाट पाहत असतात. गेल्यावर्षी मी ‘लोकमत’च्या महामॅरेथॉनचा आनंद घेतला. याहीवर्षी आपण सोबत धावू. - मंगेश चव्हाण, शहर पोलिस उपअधीक्षक.
‘लोकमत’च्या महामॅरेथॉनची राज्यात सर्वत्रच चर्चा असते. यात हजारो स्पर्धक सहभागी होऊन लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करतात. धावणे हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. मॅरेथॉनमध्ये धावणे हा वेगळाच अनुभव असतो. सर्व कोल्हापूरकरांच्या सोबतीने यंदा ‘लोकमत’च्या महामॅरेथॉनचा आनंद घेऊ. - जयश्री देसाई, अपर पोलिस अधीक्षक