वडणगे : वडणगे (ता. करवीर) येथे बी.एच.दादा युवक मंच, तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे फॉर्म भरणेचे शिबिर शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
वडणगे परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी नेहमीच कार्यरत असलेल्या युवक मंचने २०१९ च्या महापुरावेळीही अशाच प्रकारचे शिबिर घेऊन गावातील सर्व पंचनामे फॉर्म बिनचूक भरून दिले होते. त्यामुळे सर्व शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र झालेत. त्याच पद्धतीने यंदाच्या महापुरामुळे गावातील मोठ्या प्रमाणात ऊसशेतीचे नुकसान झाले आहे. शासनाने त्याचे पंचनामे करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
युवक मंचने हीच तत्परता दाखवत फॉर्म भरण्याच्या किचकट पद्धतीमुळे एकही शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये यासाठी एकाच छताखाली ऑनलाईन उतारा काढून देणे, बिनचूक फॉर्म भरून देणे, झेरॉक्स, फॉर्म नमुने या सर्व सोईसुविधांसह सलग चार दिवस हे शिबिर घेण्यात आले होते. कृषी विभाग, तलाठी कार्यालय, तसेच वडणगे सोसायटी यांचेही या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
छत्रपती शिवाजी चौक वडणगे येथे नियोजनपूर्वक पार पडलेल्या या शिबिरामध्ये कृषी विभाग, तलाठी कार्यालय, वडणगे सोसायटी, तसेच रवींद्र पाटील, कृषी सहायक टी. के.पाटील, पिराजी संकपाळ, अध्यक्ष युवराज साळोखे, उपाध्यक्ष सतीश चेचर, महादेव पाटील, महेश साखळकर, श्रीकांत नांगरे, सचिन दिंडे, पोपट चौगले, पिराजी मेथे, माणिक जाधव, भगवान पोतदार, रमाकांत माने, समाधान पाटील, उमेश दिंडे, प्रतीक तेलवेकर, सौरभ देवणे, सनी देवणे, शुभम पाटील, महेश पाटील, वैभव पाटील, संग्राम पाटील, आशिष जाधव, मेघराज जाधव यांचे सहकार्य लाभले.