गडहिंग्लज : 'नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं' या 'लोकमत'च्या राज्यव्यापी महारक्तदान अभियानाला गडहिंग्लज विभागातही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गडहिंग्लजसह आजरा व चंदगड तालुक्यातही या मोहिमेला विविध सामाजिक संस्था, संघटना,तरूण मंडळे आणि रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.गिजवणे येथील श्री विठ्ठल मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित गडहिंग्लज विभागातील पहिल्याच शिबीरात ५५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.'संयुक्त शिवजयंती उत्सव समिती,गिजवणे आणि केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले.त्यासाठी अर्पण रक्तकेंद्र, कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले.प्रारंभी 'लोकमत'चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे व छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याचे पूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील व सरपंच पौर्णिमा कांबळे यांच्या हस्ते झाले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून शिबीराला सुरूवात झाली.सतीश पाटील म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.अशा संकटाच्या काळात रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदान देण्याचा 'लोकमत'चा उपक्रम कौतुकास्पद आहे. यावेळी उपसरपंच नितिन पाटील, ग्रामविकास अधिकारी डी.बी.कुंभार,महावीर पाटील, रमेश पाटील, लक्ष्मण शिंदे, अमित देसाई,प्रभात साबळे, संतोष पाटील, अभिजित पोटजाळे, संजय पत्की,भूषण गायकवाड,अजित बुगडे,अमित चौगुले, अमित दळवी, किरण पाटील,'लोकमत'चे वितरण व्यवस्थापक ओंकार कोठावळे, वितरण अधिकारी संग्राम पायमल व अवधूत पोळ, बातमीदार शिवानंद पाटील उपस्थित होते.यावेळी 'लोकमत'चे सहाय्यक सरव्यवस्थापक(वितरण) संजय पाटील यांनी स्वागत केले.गडहिंग्लज विभागीय कार्यालय प्रमुख राम मगदूम यांनी प्रास्ताविकात अभियानाचा हेतू स्पष्ट केला.बाली चव्हाण यांनी आभार मानले.'तिच्या' इच्छाशक्तीचे कौतुक!
अनाहुतपणे शिबीरात आलेल्या एका मुस्लिम महिलेने रक्तदानाची इच्छा व्यक्त केली. तिच्या रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याने तिला रक्तदान करता आले नाही.तरिदेखील उपस्थित सर्वांनी तिच्या इच्छाशक्तीचे विशेष कौतुक केले.
ऐन कोरोना महामारीच्या काळात रक्ताच्या तुटवड्याचे अभूतपूर्व संकट राज्यात निर्माण झाले आहे.त्यामुळे 'लोकमत'ने हाती घेतलेली मोहिम खरोखरच स्तुत्य आहे.यात सर्व सामाजिक संघटना व तरूण मंडळांनी सहभागी व्हावे.- अमित देसाई,खजिनदार, जयभवानी तरुण मंडळ,गिजवणे.
रक्ताला रक्त हाच पर्याय आहे. म्हणूनच 'लोकमत'च्या अभियानात तरूणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायला हवे.- संतोष उर्फ पिंटू पाटील,कार्यकर्ता,ओम ग्रुप,गिजवणे.