शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

क्रीडाशिक्षक भरती १२ वर्षापासून बंद, अन् म्हणे दर्जेदार खेळाडू घडवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 4:32 PM

मग शाळांमध्ये चांगले दर्जेदार खेळाडू कसे घडणार, शिवाय खेळातील तंत्रशुद्ध विकसित कशी होणार

कोल्हापूर : शालेय अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणासारख्या विषयाला सरकारने दुय्यम स्थानावर नेवून ठेवले आहे. गेल्या बारा वर्षांपासून क्रीडा शिक्षकांची भरती नाही. संस्थाही कंत्राटी पद्धतीने अशा विषयांच्या शिक्षकांची तात्पुरती नेमणूक करतात. निकषात बसत नाही म्हणून शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शारीरिक शिक्षण महाविद्यालये बंद झाली.

जर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा असेल तर पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी शहरांची वाट कोल्हापुरातील इच्छुकांना धरावी लागत आहे. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांमधून दर्जेदार खेळाडू कसा घडणार आहे, असा सवाल जाणकारांकडून व्यक्त होत आहे.राज्यभरात सर्वत्र मंगळवारी शारीरिक शिक्षण दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाची जाणकारांकडून माहिती घेतली. एकूण २००० हून अधिक शारीरिक शिक्षक उपलब्ध होते. जसे निवृत्त होतील तसे पुन्हा त्या रिक्त जागेवर क्रीडा शिक्षकांची भरती होणे अपेक्षित होते;

परंतु गेल्या बारा वर्षांपासून क्रीडा विषय वगळता अन्य विषयाच्या शिक्षकांची भरती होत आहे. व्यथा मांडण्यास संघटना गेल्या तर त्यांची बोळवण केली जात आहे. मग शाळांमध्ये चांगले दर्जेदार खेळाडू कसे घडणार, शिवाय खेळातील तंत्रशुद्ध विकसित कशी होणार, असा सवाल उठत आहे.

 

  • शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकही शारीरिक महाविद्यालय सुरू नाही.
  • राज्याच्या नवीन आकृतिबंधात क्रीडा विषयास स्थान नाही.
  • पवित्र पोर्टलमध्येही शारीरिक शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रताच उपलब्ध नाही.
  • बारा वर्षांपासून नवीन शारीरिक शिक्षकांची भरती नाही.
  • शिवाजी विद्यापीठाकडे बीपीएड, एमपीएड सुरू करण्यासंबंधी पाठपुरावा.

जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेकडून यासंबंधी शिवाजी विद्यापीठ आणि राज्य शासनाकडे गेल्या पाच वर्षांपासून काॅलेज सुरू करावे किंवा विद्यापीठात सोय करावी म्हणून पाठपुरावा केला जात आहे. - आर.डी. पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षक संघ 

क्रीडा शिक्षकांची नवीन पिढीच जर तयार झाली नाही, तर दर्जेदार तंत्रशुद्ध खेळाडू कसे निर्माण होणार, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. शालेय शिक्षणात या विषयाला पुन्हा प्राधान्य द्यावे. - प्रदीप साळोखे, क्रीडा शिक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक