शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
2
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
3
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
4
पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
6
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."
7
महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?
8
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
9
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
10
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
12
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
13
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
14
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
15
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
16
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
17
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
18
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
19
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
20
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट

शहर, जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचा फैलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:16 AM

कोल्हापूर : कोरोनापाठोपाठ शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनिया या साथीच्या आजारांचा फैलाव गतीने होत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाने सतर्क ...

कोल्हापूर : कोरोनापाठोपाठ शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनिया या साथीच्या आजारांचा फैलाव गतीने होत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डासांची उत्पत्ती स्थान नष्ट करणे आणि डासांपासून बचाव करण्याकडे नागरिकांनी विशेष लक्ष केंद्रित करावे, असे आरोग्य प्रशासनाने आवाहन केले आहे.

दोन महिन्यांपासून शहर, जिल्ह्यात कोरोना आजाराचा उद्रेक झाला आहे. या आजाराने मृत होणाऱ्यांची संख्याही दोन अंकी आहे. अशातच डेंग्यू, चिकुनगुनिया अशा साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. शुक्रवारी कळंबा येथे एका महिलेचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनातही खळबळ उडाली आहे. आरोग्य प्रशासन त्या महिलेचा नेमका कोणत्या आजाराने मृत्यू झाला, याचा शोध घेत आहे.

सध्या कळंबा, उचगाव, पुलाची शिरोली, मुडशिंगी, कणेरी, सांगवडे, सांगवडेवाडी, शिरोळ, कागल येथे डेेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे जिल्हा हिवताप विभागाचे अधिकारी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने जनजागृती करीत आहेत. जास्त दिवस पाण्याची साठवणूक करू नये, घर आणि परिसरातील डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावेत, डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदानीचा वापर करावा, अशी जागृती केली जात आहे; पण जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने पाणी साठून राहण्याचे आणि दलदलीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गटारांचीही नियमित स्वच्छता न झाल्याने डास कमी होत नसल्याचे चित्र आहे.

चौकट

उपनगरातही

सदरबाजार, जवाहरनगर, सुभाषनगर, जागृतीनगर, टेंबलाईवाडी, शाहूमील कॉलनी येथे डेंग्यू, चिकुनगुनिया आजारांचा फैलाव गतीने होत आहे. घरात साठवून ठेवलेल्या पाण्यात आणि घराशेजारी असलेल्या दुचाकी, चारचाकीचे टायर, प्लास्टिक, पत्र्याच्या डब्यात साठलेल्या पावसाच्या पाण्यात डास तयार होत आहेत. यामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढते आहे.

कोट

शहर, उपनगरे आणि जिल्ह्यातील काही गावांत डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण सापडत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने डासही वाढले आहेत. परिणामी साथीच्या आजारांचाही प्रसार होत आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. घर, परिसराची स्वच्छता राखावी. डासांपासून बचाव करून घ्यावा. डबक्यातील पाण्यात डास तयार होऊ नयेत, यासाठी गप्पी मासे सोडावेत.

डॉ. विनोद मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी