शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

ठिबकचा उत्पादनवाढीवर शिडकाव...!

By admin | Published: February 09, 2015 11:26 PM

पाणी बचत, उत्पादन वाढ : जिल्ह्यात१३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आले ‘ठिबक’खाली

दत्ता पाटील - म्हाकवे -जमिनीला कायम वाफसा अवस्थेत ठेवण्यासाठी ऊस व फळबागेसह भाजीपाला पिकांमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे हितावह आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन रासायनिक खतांचाही अधिक कार्यक्षमतेने वापर करता येतो. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होऊन दर्जेदार उत्पादनही मिळत असल्याचा निष्कर्ष कृषितज्ज्ञांना आला. जिल्ह्यात सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले. पाणी बचतीसह उत्पादन वाढ, असा दुहेरी फायदा यामुळे होत आहे.ठिबक सिंचन हा शेतीसाठी योग्य पर्याय आहे. जमिनीची प्रत टिकून राहण्यासाठी, मुळांच्या वाढीला, पिकांच्या योग्य वाढीसाठी, पाणीधारण क्षमता वाढून पृष्ठभागावरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन थांबविण्यासाठी ठिबक पर्याय आहे. मुळांच्या कक्षेतील ओलावा व हवा यांचे संतुलन साधले गेल्याने उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होते. तसेच ४५ टक्क्यांपर्यंत पाणी बचत होते. ठिबक सिंचनामध्ये सूक्ष्मनलिका पद्धत, दाबनियंत्रण असणारी व नसणारी डिपर्स पद्धत, तसेच लॅटरलचे आत ड्रिपर्स असणारी व ड्रिपर्स नसणारी पद्धत कार्यान्वित आहे. जमिनीच्या पृष्ठभागाखाली दाब नियंत्रण असलेली व दाब नियंत्रण नसणारी ड्रिपर्स या दोन्ही पद्धतींचा वापर करता येतो.रासायनिक खते ठिबकद्वारे दिल्याने ही खते थेट पिकांच्या मुळांच्या सहवासात येतात. त्यामुळे खतांचीही ३० टक्क्यांपर्यंत बचत होऊन उत्पादन खर्चावर मर्यादा येते. तण उगवत नसल्याने खुरपणी, आंतरमशागत व तणनाशकांचा खर्चही कमी होतो. दरम्यान, बारकाईने अभ्यास केला असता ठिबक केलेल्या शेतीतून अधिक उत्पादन मिळाल्याचे निष्कर्षाअंती दिसते.१९९८-९९ पासून सुरू झालेल्या ठिबक सिंचन योजनेला गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने यासाठी अनुदान देताना पीकनिहाय अनुदानाऐवजी लॅट्रोनच्या संस्थेवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सिंचन पद्धत शेतीच्या भविष्यासह शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी हितावह ठरणारी आहे.- मोहन आहोळे, जिल्हा अधीक्षक हंगामनिहाय पिकाला पाण्याची गरज वेगवेगळ्या प्रमाणात असते. उसासाठी हिवाळ्यामध्ये ठिबक संच दोन ते अडीच तास दररोज सुरू ठेवावा, तर उन्हाळ्यामध्ये साडेतीन ते चार तास तसेच पावसाळ्यात (पावसाने जास्त काळ दडी मारल्यास) आवश्यकतेनुसार एक ते दीड तास ठिबक संच सुरू ठेवावा.शासनाचे अनुदान, कारखान्याचे प्रोत्साहन