शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

स्फोटाचे धागेदोरे शोधण्यासाठी पथक आंध्रप्रदेशकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 4:17 PM

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखालील स्फोटाचे धागेदोरे शोधण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशातील अमरावती गावाकडे शुक्रवारी सकाळी रवाना झाले. ...

ठळक मुद्देस्फोटाचे धागेदोरे शोधण्यासाठी पथक आंध्रप्रदेशकडे रवानाउजळाईवाडी स्फोट प्रकरण : धागेदोरे हाती लागण्याची शक्यता

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखालील स्फोटाचे धागेदोरे शोधण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशातील अमरावती गावाकडे शुक्रवारी सकाळी रवाना झाले. हुबळी येथून बकेटमधून आलेली स्फोटके व उजळाईवाडीत सापडलेली स्फोटके यांच्यात साम्य आहे. त्या पार्श्वभूमीवर काहीतरी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महिन्याभरापूर्वी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली स्फोट झाला होता. त्यानंतर तेथे लपवून ठेवलेली स्फोटकेही सापडली होती. ६९ गावठी बॉम्बही पोलिसांनी जप्त केले आहेत. या घटनेनंतर काही दिवसांत हुबळी रेल्वे स्थानकात कोल्हापूरच्या नावाने आलेल्या पार्सलचा स्फोट होऊन यात दोघे जखमी झाले. हुबळी व उजळाईवाडीतील स्फोटकात साम्य आहे.हुबळीत आलेली स्फोटके आंध्र प्रदेशातील अमरावती गावातून आली होती. ती कोणी पाठवली?, त्यामागील हेतू काय होता?, कोल्हापुरात ती कोणाकडे येणार होती? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे; त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उजळाईवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांचे पथक शुक्रवारी सकाळी आंध्र प्रदेशला रवाना झाले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर