शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

ssc exam: जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याची अफवा, परीक्षा विभागाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:17 AM

जयसिंगपूर : दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर फुटल्याने शहरात आज, बुधवारी खळबळ उडाली होती. गतवर्षीच्या पेपरमधील तारखेत खाडाखोड ...

जयसिंगपूर : दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर फुटल्याने शहरात आज, बुधवारी खळबळ उडाली होती. गतवर्षीच्या पेपरमधील तारखेत खाडाखोड करुन खोडसाळपणे केल्याचे समोर आले आहे. याबाबत खातरजमा केली असून पेपर फुटल्याची माहिती चुकीची असल्याचा खुलासा परीक्षा विभागाने केला आहे.शहरातील एका शाळेत मुख्य केंद्र असून येथून तालुक्यातील शाळांमध्ये पेपर दिले जातात. दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर मंगळवारीच फुटल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी गटशिक्षणाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. घटनेचे गाभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केद्रावर भेट देऊन माहिती घेतली.केवळ पाचशे रुपयांना पेपर विक्री होत असल्याचा आरोपही यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. तर जबाबदार असणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी अशीही मागणी केली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली. मात्र प्रत्यक्षात परीक्षा विभागाने खातरजमा केली असता  मागील वर्षीच्या पेपरमधील तारखेत खाडाखोड करुन तो पेपर सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला त्यामुळे पेपर फुटल्याची अखेर अफवाच ठरली. 

पेपर फुटल्याची माहिती चुकीची आहे. गतवर्षीच्या पेपरमधील तारखेत खाडाखोड करुन तो पेपर सोशल मीडिया टाकण्यात आला आहे.  - डी.एस.पवार, सहाय्यक सचिव परीक्षा विभाग कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावी