नवे पारगाव : तळसंदे (ता.हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड पॉलिटेक्निक महाविद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'एस.एस.सी. स्कॉलर २०२१' ही बहुपर्यायी परीक्षा घेण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करून घेतलेल्या या परीक्षेमध्ये २० शाळांमधून ६५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या परीक्षेत किणी हायस्कूलच्या अनुजा कुलकर्णी हिने प्रथम क्रमांक मिळविला. घुणकी हायस्कूलच्या सदिच्छा पाटील हिने द्वितीय तर चिंचवाड हायस्कूलच्या श्रेया पाटील हिने तृतीय क्रमांक मिळविला. सावर्डे, आरळे व वळिवडे हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरवण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, शिल्ड आणि प्रमाणपत्राचे वाटप शाळेत जाऊन करण्यात आले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.ए. खोत यांनी अभिनंदन केले. प्रा. ए.व्ही. खामकर, पी.पी. महाजन, ओ.पी. माने यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. या उपक्रमाबाबत व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता, रजिस्ट्रार भागाजे यांनी अभिनंदन केले.