शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

लालपरीची बुधवारपासून तिकीट दरात १० टक्के हंगामी वाढ, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना भुर्दंड बसणार

By सचिन भोसले | Published: November 06, 2023 7:20 PM

या मार्गावर धावणार जादा बसेस

कोल्हापूर : दिवाळीच्या तोंडावर खासगी वाहनचालकांकडून भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यातच आता एसटी महामंडळानेही ८ ते २७ नोव्हेंबर दरम्यान १० टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचा भुर्दंड बसणार आहे. दुसरीकडे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी उद्या, बुधवारपासून महामंडळाकडून पुणे मार्गावर २२० जादा बसेसही सोय करण्यात आली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एस.टी.महामंडळ दरवर्षीप्रमाणे १० टक्के तिकीट दरात ह्ंगामी वाढ करते. त्यानंतर पुन्हा केलेली भाडेवाढ रद्द करते. यंदा त्याप्रमाणेच वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खासगी प्रवासी वाहतुकदारांनीही यापुर्वीच तिकीट दरात वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना जादाचा भुर्दंड बसणार आहे.

वाढलेले दर असे,मार्ग - साधी बस सध्याचे दर - नवीन दर

कोल्हापूर-मुंबई- ५७०- ६३५कोल्हापूर-पुणे- ३३०-३७५ (शिवशाही- ९४०), (शिवाई- ५४०)

कोल्हापूर- सोलापूर- ३७५-४१५कोल्हापूर- सातारा-१९०-२१०

कोल्हापूर- सांगली- ७०-८०कोलकोल्हापूर-रत्नागिरी- २००-२२०

कोल्हापूर- सावंतवाडी- २५५-२८०कोल्हापूर-कणकवली- १७५-१९५

कोल्हापूर-पणजी- ३६०-३९०कोल्हापूर -छ.संभाजीनगर- ६८०-७५०(शिवशाही- १११०)

कोल्हापूर- अहमदनगर- ५२५- ५७५कोल्हापूर- गडहिंग्लज- ९०-९५

कोल्हापूर-चंदगड- १७५-१९०कोल्हापूर-आजरा- १२५-१४०

या मार्गावर धावणार जादा बसेसराज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या कोल्हापूर विभागातून मुंबई, पुणे, बीड, परभणी, अक्कलकोट, तुळजापूर, बंगळूरू अशा विविध मार्गावर जादा वाहतुक केली जाणार आहे. ही वाहतुक ९ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. याशिवाय दिवाळीपूर्व वाहतुकीकरीता ९ ते ११ या कालावधीत खास पुणे मार्गावर नियमित २२० बसेसची सोय करण्यात आली आहे. दिवाळीनंतर परतीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. या फेऱ्या ऑनलाईन आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिवाळीसह भाऊबीज सणासाठी प्रवासी गर्दीनूसार जिल्हाअंतर्गत ग्रामीण मार्गावर जादा वाहतुक केली जाणार आहे. याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा.असे आवाहन विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर