इचलकरंजी : येथील मध्यवर्ती एस.टी. बसस्थानकावरील अस्वच्छता, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाच्या समस्येसंदर्भात मंगळवारी शहर शिवसेनेच्यावतीने आगारप्रमुख ए. बी. कुलकर्णी यांना घेराव घालून निदर्शने केली. यावेळी आठवड्याभरात सुधारणा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.शहरातील मध्यवर्ती एस.टी. बसस्थानक आगारामध्ये व या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता आणि पिण्याचे पाणी उपलब्ध नसणे, आदी समस्यांमुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आॅयासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख धनाजी मोरे, उप जिल्हाप्रमुख महादेव गौड, नगरसेवक सयाजी चव्हाण, आदींच्या नेतृत्वाखाली आगारप्रमुख कुलकर्णी यांना शहापूर येथील आगाराच्या ठिकाणी जाऊन घेराव घातला. त्याचबरोबर आगाराकडे असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जातो, याबाबतचा जाब विचारण्यात आला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत आठ दिवसांमध्ये सुधारणा होईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनामध्ये मलकारी लवटे, दीपक घाटगे, सचिन खोंद्रे, अण्णासाहेब बिलुरे, आप्पासाहेब पाटील, आदींनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)
एस.टी. आगारप्रमुखांना घेराव
By admin | Published: February 10, 2015 11:36 PM