आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २५ : उमा टॉकीज चौकात बुधवारी सांयकाळी एस. टी.अपघातामध्ये अपघातात दोघे जागीच ठार झाले; तर नऊजण गंभीर जखमी झाली. या अपघातामधील कांडगाव, ता. करवीर येथील एस. टी.चालक रमेश सहदेव कांबळे याला महामंडळाच्यावतीने तातडीने निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी डी. बी. कदम यांनी माध्यमाशी बोलताना दिली. कदम म्हणाले,उमा टॉकीज चौकातातील एस.टीच्या अपघाताची सविस्तर माहिती आम्ही घेत आहोत. तात्काळ आम्ही चालक रमेश कांबळे यांच्या निलंबनाची कारवाईही केली आहे. चालक कांबळे यांची जानेवारीमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यामध्ये कांबळे आरोग्य तपासणीचा रिपोर्टही फिट म्हणून आला आहे, तो रिपोर्टही आम्ही पाहिला आहे. यासह प्राथमिक टप्प्यांमध्ये काल झालेल्या अपघातामधील एस.टी बस गाडीची प्राथमिक पाहणी केली असता त्या गाडीमध्ये कोणताही बिघाड नव्हता. या अपघाताबाबत चालक कांबळे यांच्याशी कोणतब्रेथ अॅनलायझर...एसटी चालकांने मद्यपान केले आहे का, याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक विभागातील सर्व डेपोंमध्ये ब्रेथ अॅनलायझर मशिन ठेवण्यात आले आहे. एकाद्या चालकाबाबात अशी शंका आली किंवा प्रवाशांनी याबाबत तक्रार केल्यास तात्काळ त्यांची तपासणी केली जाते. वर्षातून एकदा आरोग्य तपासणी एसटीचा माथेफिरू बसचालक संतोष माने याने केलेल्या कृत्यानंतर एसटीच्या सर्व चालकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. वर्षातून एकदा सर्व चालकांची आरोग्य तपासणी केली जाते, यामध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग याची तपासणी करण्यात येत आहे. चालकांमध्ये कोणत्या आजारीची लक्षणे आढळल्यास त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येते.
एसटीचा चालक रमेश कांबळे निलंबित
By admin | Published: May 25, 2017 6:30 PM