कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेमुळे मागील वर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नाही. त्यामुळे मुंबई, पुणेहून कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांवर निर्बंध आले. त्यामुळे गणेशभक्तांनीही प्रवास करणे टाळले. बसेसही रस्त्यावर उतरल्या नाहीत. त्याचा अर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात कोरोनाचे संकट काही प्रमाणात टळले आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातून खास मुंबई व पुणे येथे १०० हून अधिक बसेस पाठविण्यात आल्या आहेत. त्याशिवाय पुणे ते कोल्हापूर या मार्गावरही ५० बसेसची सोय केली आहे. मागणी वाढल्यास बसेसमध्ये वाढ केली जाणार आहे.
जादा बसेसची सोय अशी
मुंबई, पुणे ते कोकणकरिता एसटीच्या कोल्हापूर विभागातून १०० बसेस सोमवारी पाठविल्या जाणार आहेत. याशिवाय कोल्हापूर,गारगोटीहून ठाणे, कल्याणकरिता प्रत्येकी दोन बसेसची सोय केली आहे. कोल्हापुरातून रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी ७, ८ आणि ९ या दिवशी ५ जादा बसेसची सोय केली आहे. जिल्ह्याअंतर्गत बारा आगारातून ग्रामीण भागासाठी गणपती स्पेशल म्हणून जादा बसेसची प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार सोय करण्यात आली आहे.
कोट
विभागातून मुंबई, पुणेकर गणेशभक्तांसाठी जादा बसेसची सोय केली आहे. मंगळवार (दि.७) ते १० या काळात पुरेशा प्रमाणात प्रवाशांची उपलब्धता असल्यास आणखी जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जातील.
- शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ कोल्हापूर विभाग