कोल्हापूर : राज्यांतर्गत कोल्हापूर जिल्'ातून बाहेर जाणाऱ्या मजुरांना एस. टी. बसेसने पाठविण्याचे नियोजन सुरू केले आहे. यासाठी एस. टी. प्रशासनाने सुमारे ३०० बसेसची तयारी केली आहे. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यात सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्रे तयार केली जात आहेत.
परजिल्'ांतील कामगार, मजुरांना सोडण्यासाठी प्रशासनाकडून एस. टी. बसेस हा पर्याय ठेवला आहे. त्यानुसार एस. टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे ही सुमारे ३०० बसेसची तयारी ठेवली आहे. जिल्हा प्रशासनाने मागणी केल्यास या जादा बसेस प्रशासनाच्या ताब्यात दिल्या जाणार आहेत. याच्या नियोजनासाठी प्रत्येक आगारामध्ये एक अधिकारी एस. टी. कडून नियुक्त करण्यात आला आहे.
सध्या बाहेर जाणारे मजूर, कामगार व नागरिक याद्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्या जात आहेत. त्या जिल्'ांनी संमती दिल्यानंतर या कामगार, मजुरांना पाठविले जाणार आहे. तोपर्यंत इतर सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. यामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्रे तयार केली जात आहेत. परवानगी आल्यानंतर राज्यातंर्गत परजिल्'ांतील कामगार, मजुरांना पाठविण्याचे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.
बाहेर जाण्यासाठी व जिल्'ात येण्यासाठी आॅनलाईन नोंदणी सुरू आहे. संबंधित लिंकचा जादा वापर होत असल्याने ही प्रक्रिया सुरू आहे. बाहेर जाण्यासाठी अनेक नागरिकांकडूनही नोंदणी सुरू आहे. त्यांच्याकडून स्वत:ची वाहने असल्यास व ते जेथे जाणार आहेत, त्या जिल्हाधिकाºयांकडून परवानगी मिळाल्यास त्यांना पाठविले जाणार आहे. अद्याप जिल्'ातून कोणालाही परजिल्'ांत पाठविलेले नाही. परंतु येत्या दोन ते तीन दिवसांत या प्रक्रियेला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.