शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

एस.टी.ची वाहतूक सुरळीत - संप मागे : कोल्हापूर कर्मचाऱ्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:52 AM

एस. टी. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप शनिवारी रात्री अखेर मिटला. त्यामुळे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला.

ठळक मुद्देएकजुटीमुळे संप यशस्वी-संघटनांचे नेते

कोल्हापूर : एस. टी. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप शनिवारी रात्री अखेर मिटला. त्यामुळे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. संप मिटताच रात्री उपलब्ध होतील त्या कर्मचाऱ्यांमार्फत विविध मार्गांवर बसगाड्या सोडण्यात येत होत्या. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे शनिवारी काळ्या-पिवळ्या टॅक्सीतून प्रवाशांना सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे दिवसभर प्रवाशांची गैरसोय टळली.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कोणतीही घोषणाबाजी नाही, नुकसान करायचे नाही, असे नियम पाळत कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. ‘बंद’मुळे संभाजीनगर व रंकाळा बसस्थानकांबाहेर शुकशुकाट होता. दोन दिवसांत कोल्हापूर विभागाचे सुमारे एक कोटीचे नुकसान झाले. ‘शिवशाही’तर्फे दर अर्ध्या तासाने शिवशाही बसगाडी सोडण्यात येत आहे. या गाड्या, कºहाड, सातारामार्गे जात असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सोय झाली. रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबईतील बैठक यशस्वी झाल्याने संप मागे घेण्यात आला.२ हजार ८६५ कर्मचारी सहभागीकोल्हापूर जिल्ह्णात एस. टी. महामंडळाकडे प्रशासकीय, कार्यशाळा, चालक व वाहक असे एकूण चार हजार ८४४ कर्मचारी कार्यरत आहेत. काहीजण साप्ताहिक सुटी, दौरा, अधिकृत रजेवर आहेत. त्यापैकी शनिवारी २ हजार ८६५ कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते.दोन ‘शिवशाही’ बसची काच फोडलीशिरोली फाटा येथे शनिवारी मध्यरात्री कोल्हापूर-पुणे या शिवशाही गाडीची तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसवर नेसरीपासून दोन किलोमीटर अंतरावर अर्जुनवाडी फाट्यावर अज्ञात व्यक्तीने गाडी थांबविण्याचा हाताने इशारा करून वेग कमी झालेल्या बसच्या समोरील काचेवर दगड मारून नुकसान केले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.दिवसभरातील दृष्टिक्षेप

२५ शिवशाही बसगाड्यापुण्याकडे रवाना१ गाडी मुंबईकडे रवानारात्री आठपर्यंत फक्त२ हजार १८० फेऱ्या२८ हजार ८१४ फेऱ्या रद्द७० लाखांचे उत्पन्न बुडाले२ शिवशाही बसगाड्यांवर दगडफेकरात्री दहानंतर संप मागे.संभाजीनगर येथे जेवणाची व्यवस्थासंभाजीनगर आगार येथे परगावच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बसस्थानकांबाहेर आगारातील कर्मचाºयांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांना सकाळी एकवेळचे जेवण देऊन सर्वजण काम बंद आंदोलनात सहभागी झाले. 

मुंबईतील बैठकीत पगारवाढीबाबात सकारात्मक निर्णय झाल्याने आम्ही काम बंद आंदोलन मागे घेत आहे. सर्व कामगारांच्या एकजुटीमुळेच हे शक्य होऊ शकले.- उत्तम पाटील, विभागीय अध्यक्ष, एस.टी. कामगार संघटनाराज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या रेट्यामुळे प्रशासनास पगारवाढीबाबात योग्य निर्णय घेणे भाग पडले आहे. मनासारखी जरी पगारवाढ झाली नसली, तरी पगारवाढीच्या जवळपास गेलो आहे.- आप्पासाहेब साळोखे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)

टॅग्स :ST Strikeएसटी संपkolhapurकोल्हापूर