पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने काठी न उगारता तब्बल २२ तास श्वास रोखून खडा पहारा दिला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्यासह सुमारे साडेतीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यांवर उतरले होते. कोल्हापूर हे अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असल्याने मराठा क्रांती मोर्चा हा पोलिस प्रशासनासाठी आव्हानात्मक होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक देशपांडे, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी मोर्चाचे काटेकोर नियोजन केले. आयोजकांशी चर्चा करून चाळीस वाहनतळांची व्यवस्था केली. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण येथून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. शुक्रवारी रात्री आठपासून संपूर्ण शहराच्या सभोवती व प्रमुख मार्गावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. शनिवारी सकाळी सातपासून पोलिस मोर्चासाठी येणाऱ्या मराठाजनांना सहकार्य करत होते. भरउन्हात रस्त्यांवर उभे राहून नागरिकांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी त्यांनी घेतली. दसरा चौक, गांधी मैदान, ताराराणी पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय हे चार मुख्य मोर्चाचे मार्ग होते. या ठिकाणी बॉम्बशोध पथकाने कसून पाहणी केली. त्यानंतर अतिशय संयमी मार्गाने काठी न उगारता पोलिसांनी मोर्चाचा बंदोबस्त हाताळला. मुख्यालयातील नियंत्रण कक्षात डोळ्यांची पापणी न मिटता पोलिस सीसीटीव्हीचे फुटेज पाहत मोर्चातील हालचालींवर लक्ष ठेवून होते. दसरा चौक, ताराराणी पुतळा, गांधी मैदान, जिल्हाधिकारी कार्यालय, आदी चार ठिकाणी नियंत्रण कक्ष व चौका-चौकांत पोलिस मदतकेंद्रे स्थापन केली होती. दसरा चौकातील नियंत्रण कक्षामध्ये पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, व्ही. व्ही. सबनीस, हवालदार दत्तात्रय दुर्गुळे, सहा. पोलिस उपनिरीक्षक मयूरी भोपळे हे अधिकारी कार्यरत होते. विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक देशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, सुहेल शर्मा हे मोर्चा संपेपर्यंत रस्त्यावर उभे होते. या पोलिसांची दुपारच्या जेवणाची सोय मुस्लिम बांधवांतर्फे केली होती. तणावमुक्त पोलिस कोल्हापुरात अनेक मोर्चे निघाले. लाखाचा मोर्चा निघणार असेल तर पोलिस तणावाखाली असतात; परंतु मराठा मोर्चा लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत निघाला. मात्र, स्वयंसेवक व नागरिकांनी दाखविलेल्या शिस्तीमुळे हा मोर्चा पोलिसांसाठी तणावमुक्त ठरला. नांगरे-पाटील सायकलवर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील हे सकाळी सात वाजता सायकलवरून ताराराणी चौकात आले. तेथून त्यांनी मोर्चाच्या प्रमुख मार्गांवर सायकलवरून फेरी मारली. ताराराणी चौक, दसरा चौक, गांधी मैदान व जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात बंदोबस्ताला असणाऱ्यांना सूचना केल्या. ८०० डॉक्टरांची सेवा मोर्चादरम्यान काहींना अचानक प्रकृतीचा त्रास झाल्यास त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी म्हणून वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे चौका-चौकांत उपचार कक्ष उभारले होते, आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास जिल्हा रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालयासह शंभर बेडची क्षमता असलेले डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अॅपल-सरस्वती, अॅस्टर-आधार व विन्स यासह छोटी-मोठी ७५ रुग्णालये सज्ज होती. तसेच रुग्णांसाठी ग्लुकोजची पाकिटे उपलब्ध होती. सुमारे ८०० डॉक्टर
काठी न उगारता खडा पहारा
By admin | Published: October 16, 2016 12:35 AM